नाशिक (Share Market Fraud News) : शेअर मार्केट फसवणूक अधिक परताव्याचे आमिष दाखवत “V-12 Money My Tata Capital” नावाच्या WhatsApp ग्रुपद्वारे चौघा गुंतवणूकदारांची एकूण ५५ लाख ४१ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार नाशिक शहरात उघडकीस आला आहे. या ऑनलाईन घोटाळ्याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
शेअर मार्केट फसवणूक – बनावट WhatsApp ग्रुपमधून सुरू झाला गंडा
फिर्यादी आणि अन्य तिघांना ‘V-12 Money My Tata Capital’ नावाच्या फसवणूकग्रस्त WhatsApp ग्रुपमध्ये सामील करून घेण्यात आलं. त्यानंतर विविध अनोळख्या मोबाईल क्रमांकांवरून WhatsApp कॉल्सद्वारे संपर्क साधण्यात आला. संवादाच्या माध्यमातून आरोपींनी विश्वास संपादन केला आणि अधिक परताव्याचं आमिष दाखवून गुंतवणुकीस प्रवृत्त केलं.
लिंक पाठवून ऑनलाइन गुंतवणुकीचा सापळा
संशयितांनी काही विशिष्ट लिंक पाठवून त्यावरून गुंतवणूक करण्यास भाग पाडलं.
- फिर्यादीकडून ११ लाख ४६ हजार ५९२ रुपये
- अन्य तिघांकडून ४३ लाख ९५ हजार १३६ रुपये
अशा एकूण ५५ लाख ४१ हजार ७२८ रुपयांची फसवणूक झाली. ही घटना २८ एप्रिल ते १० जून २०२५ या कालावधीत घडली असल्याचं निष्पन्न झालं आहे.
सायबर पोलिसांचा तपास सुरू
या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून WhatsApp ग्रुपच्या अॅडमिनसह अज्ञात मोबाईलधारकांवर संशय व्यक्त करण्यात आला आहे. सायबर पोलिसांकडून तांत्रिक तपास सुरू असून लवकरच आरोपींचा छडा लागण्याची शक्यता आहे.