Ahmednagar
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागातील बोधेगाव येथील संघर्षदा योद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम २०२४-२५ च्या प्रथम मिल रोलरची पूजा दिनांक २६ रोजी दुपारी चार वाजता कारखान्याचे माजी अध्यक्ष अँड प्रताप काका ढाकणे यांचा शुभ हस्ते,जिल्हा परिषद सदस्य प्रभावती ढाकणे व मार्गदर्शक संचालक , व इतर सन्माननीय संचालकांच्या उपस्थितीत करण्यात आले. कारखान्याचे व्हाईस चेअरमन माधवराव काटे यांनी कारखान्याच्या यशस्वी हंगामासाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या कारखान्याचे माजी अध्यक्ष प्रताप ढाकणे बोलताना म्हणाले भगवान बाबाची शपथ घेऊन सांगतो माझा जीव आमदारकीत अडकलेला नाही माझा जीव सत्ता संपत्तीत अडकलेला नाही मला या भागात पाणी आणण्यासाठी पाच वर्षासाठी आमदारकीचा अवतार पाहिजे असे प्रतिपादन त्यांनी केले. शेवटची लढाई असून आमदार मी नाही तर तुम्ही होणार असल्याने कामाला लागण्याचे आवाहन त्यांनी केले.या कार्यक्रमास कारखान्याचे संचाल.प्रकाश घनवट, बाळासाहेब फुंदे, त्रिंबक चेमटे, रंजीत घुगे, सुभाष खंडागळे, रमेश गरजे, पोपटराव केदार, तीर्थराज घुंगरड, अभिमन्यू विखे , प्रवीण काळुसे,कारखान्याचे संचालक मंडळ इतर अधिकारी कर्मचारी सभासद आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.