तब्बल आठ महिन्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा उद्योग मित्र ची बैठक संपन्न

तब्बल आठ महिन्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा उद्योग मित्र ची बैठक संपन्न

तब्बल आठ महिन्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा उद्योग मित्र च्या बैठकीत अनेक विषयांवर सकारात्मक चर्चा झाली असून नाशिक जिल्ह्यातील चौदाही तालुक्यांमध्ये औद्योगिक क्षेत्र निर्माण करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहे तसेच उद्योजकांच्या प्रश्न तातडीने मार्गी लागण्यासाठी तीन उपसमत्या तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहे
तब्बल आठ महिन्यानंतर झालेल्या झूम बैठकीत जिल्ह्यातील उद्योग क्षेत्र संबंधित 42 महत्वपूर्ण विषय ठेवण्यात आले होते या बैठकीत अनेक विषयावर सकारात्मक चर्चा झाली असून महापालिकेच्या संबंधित या बैठकीत 22 विषय असल्याने या प्रश्नाबाबत येत्या दहा दिवसात स्वतंत्र बैठक घेण्याच आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल असून नाशिक जिल्ह्यातील 14 तालुक्यात औद्योगिक क्षेत्र निर्माण करण्याच्या सूचना देखील या बैठकीत करण्यात आले आहे .
यावेळी या बैठकीत गेल्या अनेक वर्षापासून चा औद्योगिक क्षेत्राशी संबंधित कायमस्वरूपी औद्योगिक प्रदर्शनासाठी जागा उपलब्ध करण्याच्या विषयाला मान्यता मिळाली असून त्रंबक रोडवरील खादी ग्रामोद्योग येथील जागेवर आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रदर्शन केंद्र उपलब्ध केले जाणारा असून कोणत्याही प्रकारचे निधी कमी पडणार नाही असे आश्वासन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी या बैठकीत दिल्या असून मनपा जिल्हा परिषद संबंधित विषयांवर स्वतंत्र बैठकीचे आयोजन करण्याचे निर्देश दिले आहे त्याचबरोबर विविध तीन उप समित्या तयार करण्याच्या सूचना देखील यावेळी दिल्या नाशिक जिल्ह्याच्या उद्योग वाढीसाठी शासन आणि प्रशासन स्तरावर पाठिंबा देण्याचा विश्वास देखील जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी व्यक्त केला आहे

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

Leave a Reply