Unity of Thackeray brothers shocking alliance : ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चेने रंगत घेतली; राऊत, शेलार, देशपांडे यांचे टोले

Thackeray brothers

महाराष्ट्र हितासाठी एकत्र येण्याच्या विचारावर दुसऱ्या दिवशीही पडसाद

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणाऱ्या ठाकरे बंधूंच्या एकत्र Thackeray brothers alliance येण्याच्या विधानावर रविवारी सलग दुसऱ्या दिवशी राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटल्या. उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्याबाबत अट घातल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला, तर संजय राऊत यांनी ती अट नसल्याचं स्पष्ट केलं.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

“एकत्र येण्यासाठी कोणतीही अट नाही” – संजय राऊत (Thackeray brothers alliance)

महाराष्ट्र हिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याची ठाम भूमिका

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केलं की,

उद्धव ठाकरेंनी कोणतीही अट घातलेली नाही. फक्त महाराष्ट्र हित सर्वोच्च असावं आणि महाराष्ट्राच्या शत्रूंशी यापुढे हातमिळवणी होऊ नये, हीच आमची भूमिका आहे.”

राऊतांनी हे विधान करत मनसेकडून होणाऱ्या आरोपांना प्रतिउत्तर दिलं.

मनसेचा सवाल : “प्रमाणपत्र नको, माफी मागणार का सांगा?” (Thackeray brothers alliance)

उद्धव ठाकरेंनी १७ हजार कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले, आरोप देशपांडेंचा

मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी प्रश्न उपस्थित केला की,

“आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात मराठीसाठी आंदोलन करणाऱ्या १७ हजार मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले. उद्धव ठाकरे याबद्दल माफी मागणार का?”

त्यांनी भाजपच्या हिंदुत्वाच्या प्रमाणपत्रांप्रमाणे ठाकरे गटाने महाराष्ट्रद्रोहाचे प्रमाणपत्र देऊ नये, असंही म्हटलं.

“ती अट आहे की कट आहे?” – आशिष शेलार यांचा टोल

भाजपने घेतली चर्चेत उडी

मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार म्हणाले,

“एकाने साद घातली, एकाने अट घातली. ती अट आहे की कट आहे, ते दोघांनी ठरवावं. दोघेही पारिवारिक पक्षाचे आहेत. ठरवलं तर त्यांना शुभेच्छा.”

शेलारांच्या या वक्तव्यामुळे चर्चेला नवी दिशा मिळाली आहे.

“उद्धव-राज एकत्र आल्यास शिवसेनेची ताकद वाढेल” – छगन भुजबळ

भुजबळ यांचा सकारात्मक सूर

नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे नेते छगन भुजबळ यांनी मत व्यक्त केलं की,

“उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर त्याचा निश्चितच परिणाम होईल. ही दोघं नेते असल्यामुळे शिवसेनेची ताकद वाढेल.”