Rashibhavishya: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती विशेष राशीभविष्य: १४ एप्रिल २०२५ – तुमच्या दिवसात काय दडले आहे?

Rashibhavishya

Rashibhavishya: आजचा दिवस आहे सोमवार, १४ एप्रिल २०२५. चैत्र कृष्ण प्रतिपदा/द्वितीया, वसंत ऋतू, स्वाती नक्षत्र. विशेष नोंद – आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती! चला जाणून घेऊया तुमच्या राशीच्या माध्यमातून, आजचा दिवस काय सांगतो!

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

आजचा पंचांग:

  • राहुकाळ: सकाळी ७.३० ते ९.००
  • नक्षत्र: स्वाती
  • शुभ योग: वज्र योग (शांती करावी)
  • आज जन्मलेल्या बाळाची राशी: तुळ

(टीप: नावावरून राशी ठरतेच असे नाही.)

Rashibhavishya:

मेष (Aries):
आज अनुकूल दिवस आहे. एखादी प्रिय व्यक्ती भेटू शकते. स्पर्धा परीक्षांमध्ये यशाची शक्यता आहे. नात्यातून लाभ मिळेल. कलाकारांसाठीही हा दिवस सोनेरी!

वृषभ (Taurus):
चंद्र षष्ठ स्थानी. एखादी गोड बातमी कानावर पडेल. व्यापारात भरघोस लाभ होईल. भेटवस्तू मिळू शकतात. आर्थिक दृष्टिकोनातून दिवस फायदेशीर.

मिथुन (Gemini):
स्वप्नं सत्यात उतरतील. आर्थिक नियोजन ठरवलेलं मार्गी लागेल. लॉटरीसारख्या गोष्टींमध्ये यश मिळू शकते, पण जोखमीपासून दूर राहा.

कर्क (Cancer):
व्यवसायात चांगली वाढ दिसेल. प्रॉपर्टी व्यवहारात लाभ मिळेल. वाहनसुख मिळेल. एखादा आनंददायक प्रवास होऊ शकतो.

सिंह (Leo):
चंद्र तृतीय स्थानी. आर्थिक लाभाचे योग. समाजात प्रतिष्ठा व अधिकार वाढतील. प्रभावशाली दिवस.

कन्या (Virgo):
कामात प्रगती आणि नवे अनुभव. कलाकारांना संधी मिळतील. येणी वसूल होणार. दिवस यशस्वी ठरणार.

तुळ (Libra):
तुमच्याच राशीत चंद्र! मन प्रसन्न राहील. आनंददायक प्रसंगांची रेलचेल. मेजवानी मिळण्याचे योग.

वृश्चिक (Scorpio):
थोडा संमिश्र दिवस. नियोजनात बदल होऊ शकतो. जमीन व्यवहार थांबतील. अपेक्षित गोष्टींमध्ये विलंब होईल.

धनु (Sagittarius):
दिवस अतिशय अनुकूल. तुमच्या मनासारखी कामं पूर्ण होतील. नवीन संधी मिळतील. शेतीशी संबंधित व्यक्तींनी सावध राहावे.

मकर (Capricorn):
व्यवसायात नफा वाढेल. कामाचा ताण वाढेल पण त्याचवेळी यशही मिळेल. लेखक-विचारवंतांसाठी उत्तम दिवस.

कुंभ (Aquarius):
ग्रहमान उत्तम. नवीन आर्थिक व्यवहार घडतील. पित्याकडून काही लाभ होण्याची शक्यता. नव्या संधी उभ्या राहतील.

मीन (Pisces):
सामाजिक क्षेत्रात सक्रिय राहाल. नवीन ओळखी होतील. केतूच्या नक्षत्रातील रवीमुळे कायदेशीर अडचणी उद्भवू शकतात. काळजी घ्या.

विशेष टीप:
तुमच्या कुंडलीनुसार मार्गदर्शन, करिअर, विवाह, व्यवसाय याबद्दल जाणून घ्या.
संपर्क: ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521