आजचे 20 March 2025 चे कुंभ राशीभविष्य: कुंभ राशीच्या लोकांनी सहनशीलता ठेवा, वाद टाळा.

Horoscope

गुरुवार, २० मार्च २०२५. फाल्गुन कृष्ण षष्ठी. क्रोधी नाम संवत्सर. शके १९४६, संवत २०८१. राशिभविष्य – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521)

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

राहू काळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.००

चंद्र नक्षत्र – अनुराधा. आज जन्मलेल्या बाळाची राशी – वृश्चिक. (वज्र योग शांती करून घ्यावी)

“आज उत्तम दिवस आहे.” संत एकनाथ महाराज षष्ठी

मेष:- चंद्राचा बुध आणि शुक्राशी शुभ त्रिकोण योग आहे. गुरुशी प्रतियोग आहे. अष्टम स्थानी चंद्र आहे. संमिश्र दिवस आहे. शत्रू पराभूत होतील. धन धान्य वाढेल. अनैतिक कामे कटाक्षाने टाळा.

वृषभ:- बुध शुक्र अनुकूल आहे. आज उत्तम दिवस आहे. आर्थिक लाभ होतील. प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल. कायदेशीर कटकटींतून सुटका होईल.

मिथुन:- अनुकूल दिवस आहे. सुखद अनुभव येतील. प्रवास घडतील. व्यापारात भरभराट होईल. दानधर्म कराल.

कर्क:- पंचम चंद्र अनेक चांगले अनुभव देईन. घरगुती काम पूर्ण होईल. शेअर्स मधून लाभ मिळतील. प्रवास घडतील. अचानक धनलाभ संभवतो.

सिंह:- संमिश्र कालावधी आहे. अर्थकारण भक्कम होईल. येणी वसूल होतील. घरगुती कामे कराल. पशु लाभ होईल.

कन्या:- त्रितीय चंद्र आहे. व्यावसायिक यश मिळेल. आर्थिक लाभ होतील. अंदाज अचूक ठरतील. नात्यातून उत्तम सहकार्य लाभेल.

तुळ:- यश मिळेल. आत्मविश्वास वाढेल. कलाकारांना चांगला दिवस आहे. वक्तृत्व चमकेल. आरोग्याची काळजी घ्या.

वृश्चिक:- तुमच्याच राशीत चंद्र आहे. अनुकूल दिवस आहे. भागीदारी व्यवसायात यश मिळेल. आत्मविश्वास वाढेल. भरभराट होईल.

धनु:- संमिश्र ग्रहमान आहे. व्यय स्थानी चंद्र आहे. काही अप्रिय अनुभव येतील. कामाचे नियोजन बदलेल. दत्त गुरूंची उपासना करा.

मकर:- लाभ स्थानी चंद्र आहे. बढतीचे योग आहेत. नोकरीत चांगल्या घटना घडतील. कलाकारांना मोठे यश मिळेल. लेखन/प्रकाशन यात उज्वल भविष्य आहे.

कुंभ:- अनुकूल ग्रहमान आहे. व्यवसाय वाढेल. कामे मार्गी लागतील. जोडीदाराचा सल्ला मोलाचा ठरेल. प्रगतीचा वेग वाढेल.

मीन:- अनुकूल दिवस आहे. तुमच्याच राशीतील बुध, शुक्राशी चंद्राचा शुभ योग आहे. प्रवास कार्यसाधक होतील. मौल्यवान खरेदी होईल. मन आनंदी राहील.

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)