राशि भविष्य
ज्योतिष – सौ मधुरा पंचाक्षरी,नाशिक.
मोबाइल 9272311600
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
सोमवार, 21 ऑक्टोबर 2024. अश्विन कृष्ण पंचमी
राहू काळ – सकाळी 7:30 ते 9
आज उत्तम दिवस.
21 ऑक्टोबर रोजी जन्मलेल्या बालकांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
तुमच्यावर गुरु आणि शुक्र या दोन ग्रहांचा प्रभाव आहे.
तुम्ही महत्त्वाकांक्षी असून
मान मरातब व प्रतिष्ठा जपता. तुम्ही प्रेमळ असून मुलांबद्दल विषयी प्रेम असते. आयुष्यात प्रसिद्धी व मान मरातब उशिरा मिळतो .तुमचा उत्साह दांडगा असून प्रवासाची आवड असते .तुमच्या भोवती एक प्रकारचे वलय असून लोकांना समूहिक करण्याची शक्ती आहे. पुरुष व स्त्री या दोघांमध्येही तुम्ही लोकप्रिय असता. वडिलोपार्जित संपत्ती तुम्हाला वाटा मिळतो .अध्यात्मिक वृत्ती विकसित करून लोकांचे दुःख दूर करावे असे तुम्हाला वाटते. तुमच्याच आत्मविश्वास असून मित्रांना योग्य सल्ला देता. स्वतःच्या ज्ञानावर विश्वास असतो .धार्मिक गोष्टीची ओढ असते परंतु त्याकडे डोळसपणाने पाहता .न्यायाची आवड असते .दुसऱ्याच्या भल्यासाठी कष्ट करायला तुम्ही तयार असतात. तुम्हाला मोठ्याने बोलण्याची सवय असते .तुमच्या दिमाख, टापटीप ,व्यवस्थितपणा व काटेकोरपणा आहे. अडचणीत आलेल्याना तुम्ही मदत करता. तुमच्यातील कौशल्य बुद्धी आणि कृती दोन्हीत आढळते. तुम्हाला खेळण्याची हौस असते. हातातील कार्यात यश कसे मिळवावे याचे पूर्वनियोजन तुम्ही करता. तुमच्या दृष्टिकोन विशाल असतो ,सहवास नेहमी उत्साहवर्धक असतो. प्रेम संबंधात दुसऱ्याकडून होकार असला तरच पुढे पाऊल टाकता. उत्तम सल्लागार असून जीवनातील समस्यांवर योग्य मार्ग शोधतात.स्वतःच्या चाणाक्ष व धूर्त स्वभावामुळे आपली नोकरी व धंदा व्यवस्थितपणे सांभाळून उत्तम मोबदला मिळतो .आपले जीवन आरामदायी जाईल याकडे तुमचे लक्ष असते .पैशाने जेवढी सुखी उपभोक्ता येतात तेवढी त्याचा आनंद लुटता. तुम्ही चलाख व आकर्षक व्यक्तिमत्त्वाच्या असता. तुम्हाला आपल्या घराबद्दल आपलेपणा आहे पण ओढ नसते .टापटीप आवडत असली तरी तुम्ही स्वतः कष्ट घेत नाही, दुसऱ्यांकडून कामे करून घेता.इच्छाशक्ती तीव्र असून बुद्धी तल्लख असते .तुमचा स्वभाव हरहुन्नरी असतो ,तसेच लहरी आणि हळवाही असतो. आपल्या पतीला सर्व प्रकारे योग्य ती साथ देण्यात तुम्हाला अभिमान वाटतो .तुम्ही प्रेमळ निष्ठावान व चांगली सहधर्मचारिणी म्हणून लौकिक मिळवता.
शुभ दिवस- मंगळवार ,गुरुवार शुक्रवार
शुभ रंग :-पिवळा ,जांभळा हिरवा
शुभ रत्ने:- पुष्कराज,अमेस्थिस्ट
आजचे राशिभविष्य
मेष:- आज सुरुची भोजनाचा आस्वाद घ्याल.कलाकाराना नवीन संधी चालून येतील.बचतीकडे ओढा राहील.
वृषभ:- आज छान दिवस आहे. तुमच्या राशीत चन्द्र आहे.आत्मविश्वास वाढेल. धार्मिक कार्याकडे ओढ राहील.मानसन्मान मिळेल.
मिथुन:- आज व्यय स्थानी आणि लग्नात चन्द्र आहे.सकाळ खर्चाची.दुपारनंतर कामात आत्मविश्वास वाढेल. खरेदी होईल.
!
कर्क:- आज लाभस्थानी चन्द्र आहे. सकाळचे सत्र अनुकूल आहे. अचानक लाभाचे योग आहेत.सर्वार्थाने सौख्य लाभेल. संध्याकाळ विश्रांती ची.
सिंह:- आज नोकरी व्यवसायात वरीष्ठ खुष असतील. लाभ होईल.मनाप्रमाणे कामे होतील.
कन्या:- आज उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्यांसाठी खूष खबर मिळेल.पती- पत्नी सहकार्य मिळेल. अध्यात्मिक उन्नती साठी चांगला.
तुळ:- आज प्रवासात अडथळे, वाहन दुरुस्ती साठी खर्च संभवू शकतो. गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा कल असेल. मात्र अचानक धनलाभाचे योग शक्य.
वृश्चिक:- आज संमिश्र दिवस आहे. आर्थिक परिस्थिती चांगली राहील. बोलण्याच्या चातुर्याने लाभ होईल.पतीची मर्जी राहील.
धनु:- आज दिवसाच्या सुरवातीला प्रकृती च्या तक्रारी राहतील.आळस वाटेल.पण दुपारनंतर परिस्थितीत सुधारणा होईल.पतीचा सल्ला उपयुक्त ठरेल.
मकर:- आज संततीकडून छान समाचार मिळेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. मानसन्मानाचे योग आहेत. कलाकारांसाठी उत्तम यशाचा काळ आहे. विद्यार्थ्यांनाही कमी मेहनती त जास्त यश मिळू शकेल.
कुंभ:- आज उत्तम दिवस आहे. शेअर्स मध्ये लाभ. सौख्य लाभेल. अनपेक्षित लाभ होतील. मित्रमैत्रिणींशी संवाद घडेल. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. प्रकृती सुधारेल.
मीन:- आज धार्मिक यात्रा घडतील.लेखन,सोशल मीडियावर टिप्पणी चे कौतुक होईल.कलाकौशल्य ला प्रसिद्धी मिळेल.मनाप्रमाणे कामे होतील.
सौ मधुरा मंगेश पंचाक्षरी नाशिक
9272311600
लग्न ,करियर, गुण मीलन विषयी
सशुल्क पत्रिका पाहण्यासाठी संपर्क करावा.