Horoscope Today आजचे राशीभविष्य सोमवार, 22 ऑक्टोबर 2024.

/todays-horoscope-monday-22-10-2024/

मंगळवार, 22 ऑक्टोबर 2024
अश्विन कृष्ण षष्ठी

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

राहुकाळ – दुपारी 3 ते 4:30

आज चांगला दिवस ,हेमंत ऋतू प्रारंभ.

22*ऑक्टोबर रोजी जन्मलेल्यांमध्ये वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा:-

 तुमच्यावर हर्षल आणि शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे.हर्षल ग्रहामुळे तुमच्या जीवनात व विचारात विरोधाभास असतो. हा स्फोटक ग्रह असल्याने जीवनातं बरेच उतार चढाव होतात.तुम्ही चतुर व आकर्षक  व्यक्तिमत्वाच्या आहत.अनेक गोष्टीत रस असून सर्व गोष्टी व्यवस्थितपणे करण्यात हातखंडा असतो.टापटीप व व्यवस्थित पणा कामात असतो.घरा बद्दल आपले पणा असतो.काही वेळा तापट व कठोर पणा दिसून येतो.आयुष्यात अनेक अडचणी व विलंब असूनही पैशाच्या बाबतीत समाधानी असता.पैशाच्या बाबतीत अक्षमीकरित्या बदल होतात.तुमची शरीरयष्टी चांगली असून डोळे सुंदर असतात. स्वभावात अस्थिरता असते. अनेकदा तुम्ही अनाकलनीय वागतात. भिन्नलिंगी व्यक्तींपासून लाभ होतात. मित्र परिवार फारच छोटा असतो. भांडणे होतात मात्र त्याची फिकीर नसते. आयुष्याचा पूर्वार्ध कष्टप्रद असतो मात्र नंतर सुख आणि सफलता लाभते. तुमच्यात जबरदस्त इच्छाशक्ती आणि चिकाटी असते. कन्त्यही अडचणींवर तुम्ही मात करतात. प्रकृती सुदृढ आणि विकारवश असते. जीवनात अनेक उलाढाली होतात. स्मरणशक्ती चांगली असते. तुमच्या योजनांमध्ये वारंवार बदल होतात. जीवनात जे मिळवायचे ते शांतपणे मिळवतात. गाजावाजा केलेला आवडत नाही.  हर्षलच्या प्रभावामुळे तुमच्या जीवनात आणि तुमच्या विचारांमध्ये अनेकदा विरोधाभास जाणवतो. जीवनात बरेच चढउतार येतात. विलक्षण घटना घडतात. तुम्ही अत्यंत उत्साही प्रगतिशील आहात. कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी तुम्ही तिला तोंड देऊ शकतात. तुम्ही बुद्धिमान, चतुर, शास्त्राची आवड असणारे आणि व्यापारी वृत्तीचे आहात. मानव जातीच्या कल्याणासाठी तुम्ही तुमच्या बुद्धीचा उपयोग करतात. तुम्हाला रूढी, परंपरा फारशा आवडत नाहीत. तसेच खोटेपणा देखील आवडत नाही. तुम्ही समाजप्रिय आहात आणि तुमच्या व्यक्तिमत्व आकर्षक आहे. तुम्हाला नवीन नवीन वस्तूंची तसेच प्रवासाची आवड आहे. तुम्ही डोके शांत ठेवून काम केल्यास तुम्हाला चांगले यश मिळू शकते. तुम्ही अहंकार टाळला पाहिजे. आर्थिक बाबतीत तुम्ही नशीबवान आहात. तुमच्या वागण्यामध्ये एक प्रकारचा ठामपणा असतो. आयुष्यात तुम्ही सतत बदल करत असतात. तुमचा मित्र परिवार देखील सतत बदलत असतो. मनावर घेतल्यास जीवनात अशक्य असे काहीच राहत नाही. तुमच्या कर्तृत्वाला लवकर मान्यता मिळते. वयाच्या ४० ते ६० मध्ये महत्वाच्या घटना घडतात.

हुशार अन बुद्धिमान शास्त्राची आवड असलेले,विश्लेषण करणाऱ्या मैत्रवर्तुळात वावरणे तुम्हाला आवडते.

शुभ दिवस:- रविवार, सोमवार, शुक्रवार.

शुभ रंग:- निळा, पिवळा, नारंगी, राखाडी.

शुभ रत्न:- पोवळे, मोती, हिरा.

आजचे राशिभविष्य

मेष:- आज कामानिमित्त प्रवासाचे योग. साहित्यिकांना नवीन कल्पना स्फुरतील.पूर्वी केलेल्या गुंतवणूकिवर चांगला परतावा मिळेल.

वृषभ:- आज आर्थिक प्रगतीचा दिवस. नोकरी व्यवसायात प्रगती होईल, प्रवासात त्रास.

मिथुन:- आज तुमच्याच राशीत चंद्र आहे. आत्मविश्वास वाढेल.प्रवास लाभदायक ठरतील.संभाषण कौशल्य दिसून येईल.

कर्क: आज नोकरीत बढतीची शक्यता.शैक्षणिक यशाचा.खर्च होतील पण योग्य कारणासाठी होतील.

सिंह:- आज उत्तम दिवस. मनासारखे कामे होतील.सुखदायक दिवस.आर्थिक बाबतीत भाग्यवान रहाल.कौटुंबिक वातावरण शांत राहील.

कन्या:- आज जितकी मेहनत जास्त तितके लाभ होतील.बौद्धिक क्षमता पुरेपूर कार्यक्षेत्रात वापराल.

तुळ:- आज मुलांसाठी वेळ द्यावा लागेल.दूरच्या प्रवासाचे नियोजन कराल.वैवाहिक जीवनात कमतरता जाणवेल.

वृश्चिक:- आज कामात एकाग्रता साधणार नाही.आपल्या बुद्धिकौशल्य ने त्यात यश मिळवाल. आरोग्य जपा.

धनु:- आज उद्योग धंद्यात प्रगतीची शिखरे गाठा ल. आर्थिक दृष्टीने उत्तम.आत्मबल वाढेल.खेळी यश देईल.

मकर:- आज स्पर्धेत यश.शत्रूंचा बिमोड कराल.बुद्धी ची चमक दिसेल.कामानिमित्त भटकंती होईल.सांधेदुखी चा त्रास जाणवू शकतो.

कुंभ:- आज संतती कडे लक्ष द्यावे लागेल. कुटुंबीयांना वेळ द्यावा लागेल.आपल्या बुद्धीचातुर्याने यश मिळवाल.

मीन:- आज नोकरी व्यवसायात सुयश.प्रसिद्धी मिळेल. चतुराईने निर्णय घ्याल.

सौ मधुरा मंगेश पंचाक्षरी नाशिक
9272311600
लग्न ,करियर, गुण मीलन विषयी
सशुल्क पत्रिका पाहण्यासाठी संपर्क करावा.