बुधवार, 23*ऑक्टोबर 2024. अश्विन कृष्ण सप्तमी
आज जन्मलेल्या बाळाची विष्टि करण शांती करून घेणे
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
राहू काळ – दुपारी 12 ते 1:30
” आज दुपारी 1 वा. नंतर चांगला दिवस”
सूर्याचा स्वाती नक्षत्र प्रवेश,वाहन कोल्हा
23 ऑक्टोबर रोजी जन्मलेल्यांमध्ये वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
तुमच्यावर बुध आणि शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही महत्त्वकांक्षी असतात. कायद्याचे पालन करायला आवडते. शांतता प्रिय असतात. परंतु भोवती भोगवादी लोकांचे जाळे असते . तुम्हाला व्यावहारिक व आध्यात्मिक अशा दोन्ही गोष्टीची जोड मिळते. संगीत ,वाङ्मय मय प्रवासाची आवड असते. पाण्याजवळ तुमच्या भाग्योदय होतो .वरिष्ठ लोकांकडून मदत संरक्षण मिळते. विरुद्ध लिंगी व्यक्तीमध्ये तुम्ही लोकप्रिय असता. तुमच्याकडे चांगली शब्द संपत्ती असल्यामुळे बोलण्यात, लिखाणात, भाषण देण्यात, शिकवण्यात यश मिळते. मोठेपणा,प्रतिष्ठा, मान या गोष्टीला अधिक महत्त्व देता. दुसऱ्याची परीक्षा झटकन करण्याचे ज्ञान तुमच्याकडे उपजतच असते .तुम्हाला आतल्या आवाजाची देणगी असते. तुम्ही स्वतः कलाकार असून कला प्रिय देखील आहात. मनाने तुम्ही उदार आणि विचारी असून इतरांची कदर करतात. तुमच्या सानिध्यात आल्यास इतरांना आनंद होतो. तुमचे वागणे आणि बोलणे मोहक आणि आकर्षक आहे. तुम्ही समजूतदार असून विविध खेळांमध्ये यश मिळते. इतरांचे कच्चे दुवे तुम्ही बरोबर हेरतात. स्वतःचे विचार दुसऱ्याला समजून सांगायची तुम्हाला बरीच हौस असते. तुमचे उद्दिष्ट ठाम असते आणि त्या दिशेने तुम्ही मार्गक्रमण करतात. अत्यंत उच्च प्रतीचे कपडे, वाहने, घरे, दाग दागिने आणि सुगंध द्रव्य वापरण्याची आवड असते. विविध समारंभांमध्ये भाग घेणे आणि समाजात मिसळणे तुम्हाला आवडते. आयुष्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन विशाल आणि संयमी आहे. इतरांना मदत करणे तुम्हाला मनापासून आवडते. धर्म आणि तत्वज्ञान तसेच प्रवास याची तुम्हाला आवड आहे. तुम्हाला आरामशीर आयुष्याची आवड असते. घरात बाहेर दोन्ही ठिकाणी रमतात. उत्कृष्ट गृहिणी व गृहकृत्यदक्ष असतात. पतीशी जुळवून घेण्याबाबत हुशार असता. आरोग्याने सुदृढ असतात चाकोरी बद्ध आयुष्य तुम्हाला आवडत नाही, तरीही तुम्ही स्वभावाने नम्र असता.पतीच्या व्यवसायात रस घेऊन त्याला मदत करण्याकडे कल असतो. घरात टापटीप व्यवस्थितपणा असतो ,पण ही कामे दुसऱ्यांकडून करून घेण्यात तुम्ही पटाईत असतात. बुधाचा प्रभाव असल्यामुळे व्यापारी वृत्ती असे पैशाला जास्त महत्त्व दिले जाते. आर्थिक स्थैर्य मिळवण्याची महत्त्वकांक्षा असते.केलेल्या कष्टाचे चीज होते. वयाच्या 23 वर्षापासून ते पन्नास वर्षापर्यंत पैशाच्या दृष्टीने चढती कमान असते कमान असते. शेअर्स व गुंतवणुकीमुळे तुम्हाला यश मिळते .परंतु उदार वृत्तीमुळे इतर लोक तुमचा गैरफायदा घेतात.
शुभ दिवस:- बुधवार, शुक्रवार, शनिवार.
शुभ रंग:- पांढरा, निळा, हिरवा.
शुभ रत्न:- पाचू, हिरा, मोती.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
आजचे राशिभविष्य
मेष:- आज वादक,लेखक यांना नवीन संधी चालून येतील.धनप्राप्ती उत्तम होईल.भावंडांकडून लाभ होतील.
वृषभ:- आज कुटूंबियांसोबत छान भोजनाचा आस्वाद घ्याल.क्रोध टाळा.अध्यात्माकडे कल राहील.
मिथुन:- आज लक्ष्मी प्राप्ती चा योग. अनपेक्षित लाभ होतील.मन प्रसन्न राहील.
कर्क:- आज चिडचिड टाळा. ध्यानधारणा करा.मन आवडत्या गोष्टी त रमवा.आरोग्यासाठी खर्च होतील.
सिंह:- आज उत्तम दिवस. मित्र मैत्रिणींसोबत छान वेळ व्यतीत कराल,गप्पा रंगतील.आज तुमची भिशी लागू शकते.मन आनंदी राहील.
कन्या:- आज कामाच्या ठिकाणी अचानक लाभ होऊ शकतात.पतीकडून लाभ होऊ शकतो.पाणथळ जागेजवळ भाग्योदय होईल.
तुळ:- आज शैक्षणिक यश मिळेल.अचानक दूरच्या प्रवासाचे बेत ठरतील.धार्मिक कार्यक्रमात भाग घ्याल.
वृश्चिक:- आज वारसाहक्काने लाभ होतील.वाहने चालवताना काळजी घ्या. मनाविरुद्ध घटना घडू शकतात.
धनु:- आज मन आनंदी व उत्साही राहील. पतिचे सहकार्य मिळेल.जलपर्यटन घडू शकते.
मकर:- आज व्यायामाची आवड निर्माण होईल.आरोग्याकडे लक्ष पुरवाल. नोकरी इच्छुकांना खूष खबर मिळू शकते./किंवा नोकरीत बदल होईल.
कुंभ:- आज विद्यार्थि व खेळाडूंना अनुकूल आहे. कमी श्रमात जास्त यश मिळण्याची शक्यता आहे. धनलाभाचेही योग आहेत. तुमच्या आवडत्या छंदासाठी वेळ जरूर काढा.अकल्पित लाभाची शक्यता.
मीन:- आज उत्तम लाभ होतील. अंदाज अचूक ठरतील. वास्तू खरेदी चे स्वप्न पूर्ण होईल.गृह सौख्य लाभेल.
सौ मधुरा मंगेश पंचाक्षरी नाशिक
9272311600
लग्न ,करियर, गुण मीलन विषयी
सशुल्क पत्रिका पाहण्यासाठी संपर्क करावा.