अटल सेतूवर एमएमआरडीए तर्फे उभारलेली आयटीएमएस प्रणाली योग्य परिवहन आयुक्त कार्यालयाचे स्पष्टीकरण

Transport Commissioner Certifies ITMS System on Mumbai's Atal Setu as Fully Operational

मुंबई, ३० सप्टेंबर: अटल सेतूवरील एमएमआरडीए (मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण) द्वारा उभारलेली आयटीएमएस (एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन प्रणाली) योग्य असल्याचे स्पष्टिकरण परिवहन आयुक्त कार्यालयाच्या वतीने देण्यात आले आहे. काही माध्यमांमध्ये या प्रकल्पातील उपकरणांच्या कार्यक्षमतेबाबत शंका उपस्थित करण्यात आल्या होत्या, ज्यावर सह परिवहन आयुक्त शैलेश कामत यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

शासनाने ११ जुलै २०२४ रोजी जारी केलेल्या पत्रानुसार, केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ अंतर्गत नियम १६७ (ए) च्या अनुषंगाने, राज्यातील आयटीएमएस (इंटिग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम) आणि एचटीएमएस (हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम) प्रकल्पांचे नियमन करण्याची जबाबदारी राज्य परिवहन आयुक्तांना सोपविण्यात आली आहे. त्यानुसार, सह परिवहन आयुक्त (अंमल-२), मुंबई यांनी एमएमआरडीएच्या मार्गदर्शनाखाली अटल सेतूवर स्थापित उपकरणांची तपासणी केली.

२५ सप्टेंबर २०२४ रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालय, पनवेलच्या पथकासह ही तपासणी करण्यात आली. यामध्ये टोलनाक्यावरून जाणाऱ्या ओव्हरस्पीड वाहने तसेच टोल न भरलेल्या वाहनांची तपासणी करण्यात आली. याशिवाय, उरण येथील एमएमआरडीएच्या कमांड आणि नियंत्रण कक्षामधील उपकरणांची देखील तपासणी करण्यात आली. तपासणीच्या दरम्यान, या सर्व उपकरणांनी दोन्ही प्रकारच्या वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांची यशस्वी नोंद केली असल्याचे निदर्शनास आले.परिणामी,

३० सप्टेंबर २०२४ रोजी केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ मधील नियम १६७ (ए) च्या अधीन राहून परिवहन आयुक्तांनी अटल सेतूवरील आयटीएमएस प्रणाली योग्य असल्याचे प्रमाणपत्र जारी केले. याबाबत माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या अफवा निराधार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सह परिवहन आयुक्त शैलेश कामत यांनी केलेल्या या स्पष्टीकरणामुळे आयटीएमएस प्रकल्पाबाबत निर्माण झालेली शंका दूर करण्यात आली आहे.हे प्रमाणपत्र देऊन प्रशासनाने या उपकरणांच्या कार्यक्षमतेवर विश्वास व्यक्त केला आहे आणि भविष्यात वाहतूक नियमांच्या उल्लंघनांवर अधिक नियंत्रण मिळवण्यासाठी या प्रणालीचा प्रभावी वापर होईल असा आशावाद व्यक्त केला आहे.

Leave a Reply