नाशिकमध्ये शेततळ्यात बुडून दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू

Two Children Drown in Farm Pond Tragedy in Nashik

नाशिकच्या संजीवनगरमध्ये दोन मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. मोहम्मद इरशाद शाह (११ वर्षे) आणि अशरफ खान (८ वर्षे) हे दोघे खेकडे पकडण्यासाठी शेततळ्याकडे गेले होते. मात्र, खेकडे पकडताना पाय घसरून ते तळ्यात पडले, ज्यामुळे पाण्यामध्ये बुडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

या घटनेमुळे संजीवनगर परिसरात शोककळा पसरली आहे.घटनास्थळी अग्निशमन दल आणि अंबड पोलिसांनी त्वरित धाव घेतली.

चार तासांच्या प्रयत्नानंतर दोन्ही मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. या दुर्दैवी घटनेमुळे स्थानिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात असून अंबड पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Leave a Reply