Latest News : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीमध्ये अलीकडे बिघाड झाल्यामुळे त्यांना मुंबईतील एच. एन. रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. हृदयाच्या धमन्यांमधील ब्लॉकेज तपासण्यासाठी त्यांच्यावर अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांच्या सर्व चाचण्या यशस्वीपणे पार पडल्या असून, मंगळवारी रात्री त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. ते सध्या त्यांच्या निवासस्थानी, मातोश्रीवर परतले आहेत.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
उद्धव ठाकरे यांना मागील काही वर्षांपासून हृदयाशी संबंधित समस्या आहेत. काही वर्षांपूर्वी देखील त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. त्यामुळे, शिवसैनिक आणि त्यांच्या समर्थकांमध्ये काहीसा काळजीचा माहोल निर्माण झाला होता. यावेळी देखील हृदयातील ब्लॉकेजच्या समस्येसाठी त्यांनी अँजिओग्राफी करुन घेतली, ज्याद्वारे ब्लॉकेजची तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर आवश्यक ती शस्त्रक्रिया देखील पार पडली. त्यांच्या प्रकृतीबाबत आयएएनएस वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टरांनी त्यांच्यावर विविध चाचण्या केल्या होत्या आणि त्यांना यशस्वीरित्या रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीची बातमी कळल्यानंतर शिवसैनिक आणि त्यांच्या समर्थकांमध्ये चिंता निर्माण झाली होती. मात्र, त्यांचे पुत्र आणि युवा नेते आदित्य ठाकरे यांनी मायक्रोब्लॉगिंग साईट “एक्स” (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करून, सर्व काही ठीक असल्याचे सांगितले. “सोमवारी सकाळी उद्धव ठाकरे यांची पूर्व नियोजित तपासणी झाली आणि ते आता पुन्हा कामावर परतण्यासाठी सज्ज आहेत,” असं आदित्य ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केलं.
उद्धव ठाकरे यांच्यावर २०२१ मध्ये मानेच्या दुखण्यावर शस्त्रक्रिया झाली होती. त्यांच्या मानेच्या दुखण्याचा त्रास झाला होता त्यावेळी त्यांनी फिजिओथेरपीची केली होती. मात्र, आता ते पुन्हा प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर शिवसेनेच्या कामकाजात सक्रिय सहभाग घेत आहेत.
दसरा मेळाव्यादरम्यान उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि भाजपवर जोरदार टीका केली होती. आपल्या भाषणात त्यांनी हिंदू बांधवांना शुभेच्छा देत शस्त्रपूजेचा उल्लेख केला. “आमच्याकडे लढवय्या मन आहे,” असं म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांना प्रोत्साहित केलं होतं.