मॅरेथॉन स्पर्धेच्या बोधचिन्हाचे अनावरण ; महाविद्यालयाच्या प्रतिनिधींची बैठक संपन्न
आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे दि. 19 ऑक्टोबर रोजी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
नाशिक: (दि.03) – महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे दि. 19 ऑक्टोबर 2024 रोजी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या मॅरेथॉन स्पर्धेच्या बोधचिन्हाचे अनावरण नुकतेच मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) प.वि.से.प., अ.वि.से.प., वि.से.प., यांच्या हस्ते करण्यात आले.
विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकरीता विद्यापीठातर्फे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या सुदृढ व निरोगी आरोग्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्यदायी जीवनाचा एक भाग म्हणून मॅरेथॉन स्पर्धेचा उपक्रम मा. कुलगुरु महोदया यांच्या संकल्पनेतून घेण्यात येत असल्याचे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी सांगितले.
विद्यापीठातर्फे आयोजित मॅरेथॉन स्पर्धेच्या अनुषंगाने विद्यापीठात महाविद्यालयाच्या प्रतिनिधींची मा. प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक संपन्न झाली. या बैठकीस विद्यापीठाचे, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, वित्त व लेखाधिकारी श्री. एन.व्ही. कळसकर, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. देवंेद्र पाटील, विधी अधिकारी अॅड. संदीप कुलकर्णी आदी अधिकारी व नाशिक जिल्हयातील महाविद्यालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे यासाठी संलग्नित महाविद्यालयांना कळविण्यात आले आहे.