वणी बाजारात परप्रांतीय टेलरचा हिंसक प्रकार – तिघांवर कात्रीने हल्ला
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
आर्थिक वादातून हल्ला, एकजण गंभीर जखमी
Vani tailor attack : वणी (ता. बागलाण) येथे आज दुपारी बाजार पटांगणाजवळील टपऱ्यांमध्ये काम करणाऱ्या परप्रांतीय टेलरने कपडे खरेदीसाठी आलेल्या पेठ तालुक्यातील तिघांवर कात्रीने हल्ला केला. आर्थिक व्यवहारातून सुरू झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि एका टेलरने संतप्त होऊन हातातील कात्रीने थेट हल्ला केला.
या घटनेत एकजण गंभीर जखमी झाला असून, त्याला तत्काळ वणी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलवण्यात आले. इतर दोघे किरकोळ जखमी असून त्यांच्यावर वणीमध्ये उपचार सुरू आहेत.
वणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू (Vani tailor attack)
या घटनेनंतर वणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. स्थानिक नागरिकांनीही पोलिसांकडे परप्रांतीय टेलरविरोधात कारवाईची मागणी केली आहे.
परप्रांतीयांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर (Vani tailor attack)
या घटनेमुळे वणीसह संपूर्ण तालुक्यात परप्रांतीय कामगारांच्या उपस्थितीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. वणी शहरात चायनीज स्टॉल्स, हॉटेल्स, केशकर्तनालये आणि इतर सेवा क्षेत्रांमध्ये अनेक परप्रांतीय युवक काम करताना दिसतात.
स्थानिक प्रशासनाने या युवकांच्या शहानिशा करून त्यांची नोंद ठेवण्याची गरज असून, भविष्यात गंभीर घटना टाळण्यासाठी योग्य ती दक्षता घेणे अत्यावश्यक आहे.
स्थानिक प्रशासन आणि पोलिसांकडून कारवाईची अपेक्षा (Vani tailor attack)
सामाजिक सलोखा अबाधित ठेवण्यासाठी स्थानिक पोलीस स्टेशन, ग्रामपंचायत आणि नगरपालिकेने परप्रांतीय नागरिकांची ओळख व कागदपत्रे नोंदवणे गरजेचे आहे. नागरिकांनीही जागरूक राहून अशा प्रकारांच्या घटना तत्काळ पोलिसांना कळवाव्यात.