विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची महायुती सरकारवर टीका

vijay vadettivar mahayuti sarkarvar tika

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारच्या कारभारावर तीव्र टीका केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत म्हटले आहे की, “महायुती सरकार एका हाताने देऊन दुसऱ्या हाताने लुटण्याचा कारभार करीत आहे.” त्यांच्या मते, आता लहान कामांसाठी लागणाऱ्या शपथपत्रासाठी आता कमीत कमी ५०० रुपयांचे मुद्रांक शुल्क द्यावे लागणार आहे.

वडेट्टीवार यांनी पुढे स्पष्ट केले की, लाडकी बहिण योजना मतांसाठी आणली गेली आहे, ज्यावर कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. अन्य योजनांना कट लावून महायुती सरकारने जाहिरातांसाठी आवश्यक निधी कमी असल्यामुळे मुद्रांक शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

महागाई, वीज दरवाढ आणि जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किंमतींच्या पार्श्वभूमीवर, १००-२०० रुपयांमध्ये होणाऱ्या कामांसाठी नागरिकांना आता ५०० रुपये द्यावे लागणार आहे, हे वडेट्टीवार यांनी सूचवले आहे.

यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे आणि महायुती सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Leave a Reply