विंचूर – लासलगाव कांदा बाजार समितीचे विंचूर कांदा उप बाजार समिती असोसिएशनच्या नावाखाली नवीन व्यापारी लिलावास सहभागी होण्यास विरोध केला. विंचूर बाजार समितीने कांद्याचे लायसन नविन मोठ्या प्रमाणात वाटप केली. त्यात काही जुन्या व्यापाऱ्यांनी नविन व्यापाऱ्यांना विरोध केल्याने, काही काळ कांदा बाजार समिती विंचूर बंद करण्यात आली होती. जुने व्यापारी बाजार समितीमध्ये निघून गेले. तरी नवीन व्यापाऱ्यांनी कांद्याचा लिलाव करून मोठ्या प्रमाणात नग खरेदी केले. नवीन व्यापारी राजेश भडांगे, सुदाम घायाळ, प्रशांत काळे, एकनाथ जेऊघाले ,जगन काकडे, किशोर जेऊघाले , सूर्यभान घायाळ, जुन्या व्यापाऱ्यांनी यांना विरोध करून सुद्धा, यांनी आज कांदा खरेदी करून मोठ्या प्रमाणात नग खरेदी केले. काही काळ वातावरण तणावाचे निर्माण झाले होते. पोलीस यंत्रणा मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. लासलगाव पोलीस स्टेशन .एपी.आय भास्कर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वातावरण शांत करण्यात आले.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.