भारतीय क्रिकेट संघातील आक्रमक फलंदाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी Vinod Kambli यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे ठाणे (भिवंडी) येथील आकृती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आदेशानुसार, त्यांचे ओएसडी मंगेश चिवटे यांनी रुग्णालयाला भेट देऊन कांबळी Vinod Kambli यांच्या प्रकृतीची चौकशी केली. डॉक्टरांसोबत चर्चा करून उपचारात कोणतीही त्रुटी राहू नये, याची खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
Vinod Kambli : श्रीकांत शिंदे यांची आर्थिक मदत
कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी विनोद कांबळी यांना वैयक्तिक पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. ही मदत त्यांच्या फाउंडेशनमार्फत पुढील आठवड्यात करण्यात येणार आहे. तसेच, गरजेनुसार अधिक मदत देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे.
विनोद कांबळीच्या Vinod Kambli प्रकृतीची स्थिती
रुग्णालयाचे वरिष्ठ डॉक्टर विवेक त्रिवेदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, कांबळींच्या मेंदूमध्ये रक्ताच्या गाठी असल्याचे निदान झाले आहे. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असून, मूत्राशयाच्या संसर्गावर उपचार सुरू आहेत. आकृती रुग्णालयाचे प्रभारी डॉ. एस. सिंग यांनी विनोद कांबळी यांना आजीवन मोफत उपचार देण्याचे आश्वासन दिले आहे.
सचिन तेंडुलकरसोबतचा व्हायरल व्हिडीओ
काही दिवसांपूर्वी विनोद कांबळी Vinod Kambli यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. रमाकांत आचरेकर सरांच्या स्मारकाच्या उद्घाटन कार्यक्रमात सचिन तेंडुलकरसोबत मंचावर दिसलेल्या कांबळी यांना व्हीलचेअरवर पाहून चाहत्यांच्या भावना उचंबळून आल्या होत्या. या व्हिडीओनंतर अनेक माजी खेळाडू मदतीसाठी पुढे आले.
एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे भेटणार
लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे विनोद कांबळी यांना भेटून त्यांच्या कुटुंबाला आवश्यक ती मदत देणार आहेत.
He Pan Wacha : Indian Cricket : गाबा कसोटीतून या दिग्गज क्रिकेटपटूने घेतली निवृत्ती