नाशिक –Yeola Irrigation News येवला तालुक्यातील उत्तर-पूर्व भागातील सिंचन विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या ममदापूर साठवण तलाव योजनेस आता अधिक बळ मिळाले आहे. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांमुळे या योजनेच्या ₹15 कोटी 98 लाख रुपयांच्या सुधारीत अंदाजपत्रकास मृद व जलसंधारण विभागाकडून प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
योजनेचे मुख्य वैशिष्ट्ये: (Yeola Irrigation News)
- स्थान: ममदापूर, ता. येवला, जि. नाशिक
- उद्देश: उत्तर-पूर्व येवला परिसरातील शेतीसाठी जलसिंचनाची सोय व वन्य प्राण्यांसाठी जलपुरवठा
- साठवण क्षमता: 35.67 दलघफु
- पाणलोट क्षेत्र: 18 चौ. कि.मी
- बंधाऱ्याची लांबी: 220 मीटर | सांडव्याची लांबी: 79 मीटर
- वनविभाग जमीन: 28.06 हेक्टर क्षेत्रावर तलाव उभारला जात आहे
योजनेचा प्रगती अहवाल
सदर साठवण तलावाचे काम वनविभागाची परवानगी घेऊन सुरू करण्यात आले आहे. योजनेच्या मूळ खर्चात वाढ झाल्याने सुधारित प्रशासकीय मंजुरीसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला होता. आता मंजुरी मिळाल्यामुळे येत्या काही महिन्यांत शिल्लक कामे पूर्ण होऊन सिंचन क्षेत्रात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
शेती, जलसंपदा आणि पर्यावरणासाठी फायदे
- या योजनेमुळे ममदापूर व परिसरातील शेतजमिनी ओलिताखाली येणार आहेत.
- शेतकऱ्यांना शेतीसाठी वर्षभर पुरेशा पाण्याची उपलब्धता होईल.
- ममदापूर राखीव वनक्षेत्रातील वन्यजीव व प्राणी यांनाही पिण्याच्या पाण्याचा आधार मिळेल.
- पर्यावरणपूरक साठवण क्षमता वाढ होणार आहे.
मंत्री छगन भुजबळ यांचे योगदान
मंत्री छगन भुजबळ यांच्या पाठपुराव्यामुळे या प्रकल्पाला गती मिळाली असून येवला तालुक्याच्या कृषी व वनसंपदेच्या दृष्टीने ही योजना मैलाचा दगड ठरणार आहे.