रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांसाठी मोठी ऑफर घेऊन आले आहे. रिलायन्स जिओ कंपनी लवकरच ग्राहकांना १०० जीबीपर्यंत मोफत क्लाउड स्टोरेजची सुविधा देणार असून या स्टोरेजमध्ये फोटो, व्हिडिओ किंवा कोणतेही डॉक्युमेंट्स साठवता येणार असून ही माहिती रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या ४७व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत शेअरधारकांना संबोधित करताना, चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी दिली. लक्षात घ्या की गुगल आणि इतर कंपन्या काही जीबी मोफत देतात आणि त्यानंतर क्लाउड स्टोरेजसाठी शुल्क आकारतात.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
त्याचबरोबर, जिओ ब्रेन लवकरच आर्टिफिशियल इंटेलिजन्स लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. कनेक्टेड इंटेलिजन्स जागतिक दर्जाच्या इन्फ्रास्ट्रक्चरसोबत येईल. कंपनी “एआय एव्हरीव्हेअर फॉर एव्हरीवन” या थीमवर हे लॉन्च करणार आहे.
जिओ पूर्ण एआय कव्हर करणारी उपकरणे आणि प्लॅटफॉर्म्सचा एक व्यापक सेट विकसित करत आहे, ज्याला ‘जिओ ब्रेन’ म्हटले जाते. अंबानी म्हणाले, “मला विश्वास आहे की रिलायन्सच्या आत जिओ ब्रेनला अधिक चांगले बनवून, आम्ही एक शक्तिशाली एआय सेवा प्लॅटफॉर्म तयार करू शकतो. आम्ही जामनगरमध्ये गीगावॅट-स्केल एआय-सज्ज डेटा सेंटर स्थापन करण्याची योजना आखत आहोत, जे पूर्णपणे रिलायन्सच्या हरित ऊर्जेवर चालवले जाईल. आमचे उद्दिष्ट भारतातच जगातील सर्वात परवडणारी एआय इंफरेंसिंग तयार करणे आहे. यामुळे भारतातील एआय अनुप्रयोग अधिक परवडणारे होतील आणि सर्वांसाठी सुलभ होतील.”
जिओचे चेअरमन आकाश अंबानी यांनी अनेक नवीन एआय सेवांची घोषणा केली. यात जिओ टीवीओएस, HelloJio, Jio Home IoT सोल्यूशन, JioHome ॲप आणि Jio Phonecall AI यांचा समावेश करणार आहे