टाचदुखीवर घरगुती उपाय कोणता ?

टाचदुखी मध्ये सर्वप्रथम वज्रासनात बसण्याचा सराव करावा. याने तुम्हाला खूप चांगला फरक पडेल तसेच उभे राहून पाणी पिण्याची सवय थांबवावी...

पायाच्या टाचा दुखण्याची वेगवेगळी कारणे असतात. काहीजणांच्या सकाळी उठल्यावर टाचा दुखतात तर काहींना रात्री त्रास होतो. टाचदुखीची नेमकी कारणे जाणून काळजी घ्यायला हवी…_
बहुतांश प्रकरणी पायातील उतींचा एक पट्टा, ज्याला “प्लांटर फेशिय” असे म्हणतात, त्याचे नुकसान झाले किंवा तो घट्ट झाला की टाचदुखी होते. प्लांटर फेशिया हा ऊतींचा एक कडक आणि लवचिक पट्टा असतो, जो पायाच्या तळव्याखालून जातो. तो टाचेच्या हाडाला पायाच्या हाडांशी जोडतो आणि पायासाठी शॉक ऍब्सॉर्बर म्हणून कार्य करतो. या प्लांटर फेशियाचे नुकसान होऊन आतमध्ये लहान फटी (मायक्रो टियर्स) विकसित होऊ शकतात. यामुळे प्लांटर फेशिया घट्ट होऊ शकतो आणि टाचदुखी जडते. अशा वेळी आजूबाजूची ऊती आणि टाचेचे हाड यांचादेखील काही वेळेस दाह होऊ शकतो. प्लांटर फॅसायटीस हे टाचदुखीचे सर्वांत सामान्य कारण आहे. काही सोपे उपाय सोबत देत आहे…

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

टाचदुखी मध्ये सर्वप्रथम वज्रासनात बसण्याचा सराव करावा. याने तुम्हाला खूप चांगला फरक पडेल तसेच उभे राहून पाणी पिण्याची सवय थांबवावी…

शरीरात वात वाढणार नाही आणि तसेच अतिरिक्त प्रोटीनही वाढणार नाही याकडे प्रामुख्याने लक्ष द्यावे…

एक ग्लास दूधात हळद घालून रोज ते घ्यावे, याने दुखणे कमी होते…

रूईचे पान व विटेचा तुकडा गरम करून त्याने टाचा शेकाव्या…

खडे मीठ गरम पाण्यात टाकुन टाचा शेकाव्यात…

जमिनीवर टॉवेल पसरून पाय त्यावर ठेऊन पायाच्या बोटाने टॉवेल जवळ आणायचा…

बर्फाच्या शेकल्याने स्नायूना आलेली सूज जाते व त्यामूळे बरे वाटते…

फिजिओथेरपीचे काही सोपे एक्जरसाईज करावे…

हाडांमध्ये व्हिटमिन व कॅल्शियम या जीवनसत्वांच्या कमतरतेमुळे सुद्धा हा त्रास होतो. तेव्हा आहारात पूर्तता होईल असे घटक घ्यावेत. जसे की अंडी, दूध, लोणी, पनीर, दही, बदाम व इतर सुका मेवा, शेंगदाण्याची चिक्की, ज्वारीची भाकरी, पालक, केळी, पपया, ई.

टाचांना मोहरीच्या तेलाने मालीश करा. याने मसल्स रिलॅक्स होतात, व रक्तप्रवाह सुरळीत चालतो…

रोज सकाळी एलोवेरा जेल लावावे, याने देखील टाच दुखीत आराम मिळतो…

फिश ऑईल: यात ओमेगा-३ पॉलीअनसेचुरेटेड फॅटी ॲसिड असते. ज्यामूळे टाचदुखी पासून आराम मिळेल…

आल्याचा रस किंवा आले चावून खावे व लिंबू टाकून चहा घ्यावा…

ऍपल cider व्हिनेगर एक ते दीड कप पाणी व अर्धा कप व्हिनेगार टाकून उकळावे व नंतर एक कापड बुडवून ते पिळावे व टाचांभोवती गुंडाळावे. असे पाच सहा वेळा करा. याने दुखणे कमी होते…

जमल्यास रोज ग्रीन चहा घ्यावा…

अळशीच्या बीया भाजून, कुटुन रोज एक चमचा पाण्यासोबत घ्या व याचे तेल टाचांना लावा…

पाण्याची बाटली पाणी भरून फ्रिजर मधे ठेवून पूर्णपणे बर्फ झाल्यावर पायाखाली ठेवुन पाय पुढे मागे करत रहावे. सुरवातीला खुपच गार वाटते परंतु नंतर बरे वाटू लागते. असे साधारण ५-१० मिनिटे करावे. असे दिवसातुन २-३ वेळा करावे. दुसर्‍या दिवशी बराच फरक वाटेल. असे ३-४ दिवस केल्यावर खुपच फरक पडलेला जाणवेल…

बर्फाच्या शेकाने स्नायूंना आलेली सूज जाते व त्यामुळे बरे वाटते…

योग्य प्रकारची पादत्राणे वापरणे देखील महत्त्वाचे आहे. शक्‍यतो, आपण आपल्या पायाचे बाक आणि टाचा यांना आधार आणि मऊपणा देणाऱ्या, कमी ते मध्यम टाचेची पादत्राणे घालावीत. टाचा नसलेले शूज घालणे टाळावे. स्पंजची गादी असलेली पादत्राणे वापरावीत…

शक्य तेवढी विश्रांती घ्यावी. पाय सरळ व थोडा उंच करून ठेवावा. बर्फाचा शेक घ्यावा. टाचदुखी हा वाताचा प्रकार आहे.

_वरिल घरगुती उपायाने टाचदुखी बरी होण्यास नक्की मदत होईल.


: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हे कोणत्याही प्रकारे कोणत्याही औषधाचा किंवा उपचारांचा पर्याय असू शकत नाही. अधिक माहितीसाठी नेहमी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Leave a Reply