माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना धक्का: भास्करराव पाटील खतगावकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश

Former Chief Minister Ashok Chavan Shocked: Bhaskarrao Patil Khatgaonkar Joins Congress

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना मोठा धक्का बसला आहे, कारण नांदेड जिल्ह्यातील माजी खासदार व त्यांचे मेहुणे भास्करराव पाटील खतगावकर आणि त्यांच्या सूनबाई मीनल पाटील खतगावकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या टिळक भवन कार्यालयात झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत त्यांचे स्वागत करण्यात आले.या प्रसंगी माजी मंत्री आमदार अमित देशमुख, अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष आ. वजाहत मिर्जा, उपाध्यक्ष हुसैन दलवाई, माजी मंत्री डी. पी. सावंत आणि आ. मोहन हंबर्डे उपस्थित होते. खतगावकर यांच्यासोबत माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला. नाना पटोले यांनी या प्रवेशाला काँग्रेससाठी बळकटी मिळाल्याचे सांगितले आणि नांदेडमधील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची ताकद दिसून आल्याचे त्यांनी नमूद केले.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

Leave a Reply