कोविड काळातील आरोग्य कर्मचाऱ्यांची सेवा वाढवण्याची मागणी(covid aarogya karmchari)

Covid aarogya karmchari

नाशिक रोड, प्रतिनिधी: महापालिकेच्या बिटकोसह सर्व रुग्णालयांमध्ये (NMC bytco rugnalay)कोविड काळात जीव धोक्यात घालून सेवा देणाऱ्या कंत्राटी डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या सेवेची मुदत वाढवावी, अशी मागणी माजी नगरसेवक जगदीश पवार यांनी केली आहे. त्यांनी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांना निवेदन दिले असून, या आरोग्यसेवकांना डावलून वशिल्याने अन्य लोकांची भरती केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

महापालिका रुग्णालयांमध्ये मनुष्यबळाची तीव्र टंचाई असल्याने रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. सध्या मानधनावर काम करणारे डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय हे कर्मचाऱ्यांनी कोव्हिड काळात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. हजारो रुग्णांचे प्राण वाचविणाऱ्या या कर्मचाऱ्यांनी कमी साधनांमध्ये उत्कृष्ट सेवा दिली. त्यांचे वेतन वेळेवर होत नसतानाही, सेवा करार विलंबाने होत असतानाही हे कर्मचारी निष्ठेने काम करत आहेत.

तरीही या कर्मचाऱ्यांना डावलून वशिल्याने बाहेरच्या लोकांची भरती करण्याची योजना असल्याची चर्चा आहे. अशा प्रकारे नवीन कर्मचाऱ्यांची भरती झाल्यास, यामुळे सार्वजनिक आरोग्य सेवेवर विपरीत परिणाम होईल. पाच वर्षांपासून सेवा देत असलेल्या या कर्मचाऱ्यांनी अधिकाधिक योगदान दिले असून, त्यांना या पदभरतीत प्राधान्य द्यावे, अशी मागणी पवार यांनी केली आहे.

कोविड काळात या आरोग्यसेवकांनी महापालिकेच्या आरोग्य व्यवस्थेचा दर्जा उंचावला असून, त्यांना कामावरून कमी करू नये, असे पवार यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply