मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण योजना’ सुरूच राहणार, लाभ टप्प्याटप्प्याने वाढवणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन (mukhymantri Eknath Shinde ladki ki bahin Yojana aashwashan)

Mukhymantri ladki bahin Yojana

छत्रपती संभाजीनगर: महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरू केलेली ‘माझी लाडकी बहीण योजना’ ( mazhi Ladki bahin Yojana) सतत सुरू राहील आणि त्यात मिळणाऱ्या लाभाची रक्कम टप्प्याटप्प्याने वाढवली जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानात आयोजित ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी सन्मान’ सोहळ्यात मुख्यमंत्री शिंदे यांनी महिलांना आश्वस्त केले. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचीही उपस्थिती होती.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

महिलांना आर्थिक मदत आणि सक्षमीकरण

‘माझी लाडकी बहीण योजना’ अंतर्गत महिलांना दरमहा ₹१,५०० दिले जात आहेत. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे एकत्रित ₹३,००० महिलांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात झाली आहे. यापूर्वी तीन महिन्यांचे साडेचार हजार रुपये जमा करण्यात आले होते. या योजनेंतर्गत सुमारे २.५ कोटी महिलांना फायदा झाला असून, अनेक महिलांनी या रक्कमेतून छोटे व्यवसाय सुरू केले आहेत. त्यामुळे रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत आणि महिलांचे आत्मसक्षमीकरण घडून आले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनीही या योजनेचे कौतुक केले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की, पुरेशा निधीची तरतूद करण्यात आली असून योजना बंद होणार नाही. उलट, भविष्यात लाभाची रक्कम वाढवण्यात येईल.

शेतकऱ्यांना मोफत वीज, कृषीपंपांच्या बिलात सवलत

शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने साडेसात अश्वशक्तीपर्यंतच्या कृषीपंपांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे ४५ लाख शेतकऱ्यांना या निर्णयाचा फायदा झाला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी ‘मुख्यमंत्री युवा कौशल्य विकास योजना’ सुरु केल्याचे सांगितले, ज्यामुळे बेरोजगार तरुणांना रोजगार प्रशिक्षणादरम्यान दरमहा ₹६,००० ते ₹१०,००० पर्यंतचे विद्यावेतन दिले जात आहे.

दुष्काळ निवारणासाठी पाणी योजना आणि सौर कृषीपंप योजना

मराठवाड्यातील दुष्काळ निवारणासाठी पश्चिम वाहिन्या नद्यांचे पाणी मराठवाड्यात आणण्याची योजना मंजूर करण्यात आली आहे. याचबरोबर शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना’ लागू करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना सौर कृषीपंपासाठी ९०% अनुदान देण्यात येत असून, १०% रक्कम शेतकऱ्यांना भरणे आवश्यक आहे.

महिला सक्षमीकरणासाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ‘माझी लाडकी बहीण योजना’ महिलांना विकासाच्या केंद्रस्थानी आणणारी योजना असल्याचे सांगितले. त्यांनी केंद्र सरकारच्या ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ (beti bachao beti badhao) आणि ‘लखपती दीदी’ (lakhapati didi) सारख्या योजनांचा उल्लेख केला. यासह ‘लेकी लाडकी योजना’ अंतर्गत मुलींच्या खात्यावर टप्प्याटप्प्याने एक लाख रुपये जमा केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

पुरेशा निधीसह योजना कायम: अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘माझी लाडकी बहीण योजना’ साठी राज्य सरकारने पुरेशा निधीची तरतूद केली असल्याचे सांगितले. कोणत्याही परिस्थितीत ही योजना बंद होणार नाही आणि दिवाळीपूर्वी महिलांच्या खात्यावर लाभ जमा केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

महिला आणि शेतकऱ्यांसाठी प्रभावी योजना

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, ‘माझी लाडकी बहीण योजना’तून २.२२ कोटी महिलांना लाभ मिळाला आहे. त्यांनी ‘पिंक रिक्षा योजना’ सुरू केल्याचेही जाहीर केले, ज्यामध्ये १०,००० रिक्षा महिलांना वितरित केल्या जातील. शेतकरी आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी या योजना महत्त्वपूर्ण ठरत असून, त्यातून महाराष्ट्राचा विकास अधिक वेगाने होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Leave a Reply