दिवाळी-छट यात्रेकरूंसाठी मध्य रेल्वेची ५७० विशेष गाड्या

570 special trains of Central Railway for Diwali holiday travelers

नाशिकः दिवाळी आणि छट पूजा सणांच्या निमित्ताने रेल्वे गाड्यांना गर्दी होत आहे. आरामदायी प्रवास साध्य करण्यासाठी मध्य रेल्वेने प्रवाशांसाठी एकूण ५७० विशेष ट्रेन सेवांची घोषणा केली आहे. त्यापैकी ४२ सेवा आधीच सुरू झाल्या आहेत. यामध्ये वातानुकूलित विशेष, वातानुकूलित, शयनयान आणि जनरल डब्यांच्या मिश्र गाड्या आणि अनारक्षित विशेष गाड्यांचा समावेश आहे. दिवाळी, छट पूजा विशेष गाड्या मुंबई, पुणे, नागपूर येथून देशभरातील विविध ठिकाणी चालवल्या जात आहेत. ५७० दिवाळी स्पेशल पैकी १०८ सेवा महाराष्ट्रातील लातूर, सावंतवाडी रोड, नागपूर, पुणे, कोल्हापूर, नांदेड आणि इतर ठिकाणी प्रवास करणाऱ्यासाठी आहेत.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

उत्तरेकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वे दानापूर, गोरखपूर, छपरा, बनारस, समस्तीपूर, आसनसोल, आगरतळा, संत्रागाछी आणि इतर ठिकाणी ३७८ सेवा चालवत आहे. ३७८ सेवांपैकी १३२ सेवा मुंबईतून, १४६ सेवा पुण्यातून आणि उर्वरित इतर ठिकाणांहून मध्य रेल्वेवर चालवल्या जात आहेत.

दक्षिणेकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वे करीमनगर, कोचुवेली, काझीपेट, बेंगळुरू आणि इतर गंतव्यस्थानांसारख्या विविध ठिकाणी ८४ सेवा चालवत आहे.