नाशिकः वाहन परवाना नसलेल्या, बेशिस्त रिक्षाचालकांवर नाशिकरोड येथे वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. रिक्षाची कागदपत्रे, परवाना, गणवेश, बिल्ला नसणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणे आदी कारणांवरून कारवाई सुरु आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
नासिक रोड परिसरात असणारे रिक्षा स्टॅन्ड आणि नाशिक रोड-द्वारका, नाशिक रोड- पळसे, नाशिक रोड-भगूर, नाशिक रोड- जेलरोड या मार्गावर सध्या विना परवाना रिक्षा चालकांची संख्या वाढली आहे. परवाना नसताना अनेक वेळा अठरा वर्षाच्या आतील व अठरा वर्ष पुढील चालक रिक्षा चालवित आहेत. उपनगर, नाशिक रोड, दत्त मंदिर चौक, सिन्नर फाटा,देवळाली कॅम्प रोड या ठिकाणी कारवाई केली जात आहे.
अनेक रिक्षा चालक विना लायसन रिक्षा सुसाट वेगाने चालवत आहे.यामुळे प्रवाशांचा जीव टांगणीला लागत आहे. सिग्नल तोडणे, विरुद्ध दिशेने रिक्षा चालवणे असे प्रकार रिक्षाचालक करत आहेत.