Rashibhavishya : आजचे राशिभविष्य: तुमच्यासाठी शुभ आहे का की फक्त एक मृगजळ?”

/todays-horoscope-monday-22-10-2024/

शुक्रवार, *25 * ऑक्टोबर 2024*. अश्विन कृष्ण नवमी

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

राहू काळ – सकाळी 10:30 .ते 12

आज चांगला दिवस.

25 ऑक्टोबर रोजी जन्मलेल्यांमध्ये वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

 तुमच्यावर नेपच्यून आणि शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. कोणत्याही एका विषयात फार काळ तुम्ही रमत नाही .हरहुन्नरी व्यक्तिमत्व असते. प्रवासाची आवड असून परदेशाशी संबंध येतात .तुम्ही प्रामाणिक विश्वासू व निष्ठावान आहात .चंद्र नेपच्यून या ग्रहांच्या प्रभावामुळे स्वभाव अति चंचल आहे, त्यामुळे काही वेळा विसंगत स्वभावाचे दर्शन होते. तुमची स्मरणशक्ती चांगली असते. स्वतःच्या प्रेमसंबंधाबाबत तुम्ही निराशा असतात. स्वतःच्या विचारात कृतीत स्वतंत्र वृत्ती असून कोणाचीही ढवळाढवळ खपत नाही .भावनांवर ताबा ठेवण्याचे कसब तुमच्यात असते. स्वतःचे गुण दाखवण्याची तुम्हाला संधी मिळावी लागते. भाषण, लेखन, रेडिओवर श्रुतिका यात यश मिळते. तुमच्या महत्त्वाकांक्षा आणि तुमचे ध्येय अत्यंत उच्च असतात. परंपरागत प्रथांबद्दल तुम्हाला तिरस्कार असतो. एकाच वेळी तुम्ही सामर्थ्य आणि कमकुवतपणा यांचा अनुभव घेतात. तुम्हाला अंतर्गत आवाजाची देणगी असून व्यवहारात त्याचा उपयोग होतो. स्वतःचे विचार इतरांना समजून सांगण्याची तुम्हाला हौस असते. तुम्हाला क्रीडा, प्रवास, संगीत याची आवड असून तुमचे व्यक्तिमत्व प्रसन्न असते. तुमचे विचार तर्कशुद्ध असतात आणि दुरदेशाबद्दल तुम्हाला आकर्षण असते. तुम्ही सर्वसाधारण किंवा तुमच्यापेक्षा कमी प्रतीच्या माणसांमध्ये मिसळत नाहीत. आवडत्या पुस्तकांसोबत वेळ घालवणे तुम्हाला आवडते. तुम्हाला स्वतःचे ज्ञान आणि अधिकार यांची पूर्ण जाणीव आहे. तुम्ही संशयी असून प्रत्येक गोष्टीची खात्री झाल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवत नाहीत. तुमचा दृष्टिकोन विशाल आहे. हातातील कार्यात यश कसे मिळवावे याचे तुम्ही पूर्व नियोजन करतात. तुमच्यामध्ये दुरदर्शीपणा आणि व्यापारी वृत्ती असते. मनाने तुम्ही मोकळे असून तुमच्या कृतीमध्ये मुक्तपणा आहे मात्र तुमचे मन कायम अस्वस्थ असते.

शुभ दिवस:- रविवार, सोमवार, बुधवार, शुक्रवार.

शुभ रंग:- पांढरा, हिरवा, निळा, पिवळा.

शुभ रत्न:- पाचू, मोती, पुष्कराज, लसण्या.

(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)

आजचे राशिभविष्य

मेष:- आज अध्यात्मिक लाभ होतील. कौतुकाची थाप मिळेल.

वृषभ:- आज धार्मिक कार्यात भाग घ्याल.दानधर्म कराल.लेखनाला प्रसिद्धी मिळेल.

मिथुन:- आज उत्तम दिवस. कलाकौशल्य दिसेल.आर्थिक लाभाचा.

कर्क:- आज तुमच्याच राशीत चन्द्र आहे .आत्मविश्वास वाढेल.वाहन सौख्य लाभेल. लाभदायक घटना घडतील.

सिंह:- आज इतरांवर प्रभाव राहील.आरोग्य सुधारेल.

कन्या:- आज आर्थिक दृष्टीने उत्तम दिवस.अगोग्याच्या तक्रारी वर तोडगा मिळेल.घरातील वातावरण छान राहील.

तुळ:- आज पती खूष असतील.अनपेक्षित धनलाभाची शक्यता. बढती मिळण्याची शक्यता.

वृश्चिक:- आज लाभ होतील.दूरच्या प्रवासाची शक्यता. धार्मिक कार्यासाठी खर्च होतील.

धनु:- आज रुटीन चालू ठेवा.अष्टमात चन्द्र आहे.वाहन काळजी पूर्वक चालवा.

मकर:- तुमची जोडीदारासोबत खरेदी होईल.मन प्रसन्न राहील.भागीदारी व्यवसायात नवीन संधी चालून येतील.

कुंभ:- आज स्पर्धेत यश मिळेल.नोकरीत कामगिरी बद्दल शाबासकी मिळेल.मात्र आरोग्याची काळजी घ्या.

मीन:-आज संतती शी हितगुज होईल.शैक्षणिक दृष्टीने चांगला.अकल्पित धनलाभाची शक्यता.

सौ मधुरा मंगेश पंचाक्षरी नाशिक
9272311600
लग्न ,करियर, गुण मीलन विषयी
सशुल्क पत्रिका पाहण्यासाठी संपर्क करावा.