महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा विजय मिळाल्याच्या निमित्ताने देवळाली गावातील शिवसेना शिंदे गटाने जल्लोष साजरा केला. देवगाव येथील महात्मा गांधी पुतळ्यासमोर फटाके फोडून आणि गुलालाची उधळण करून या विजयाचा आनंद व्यक्त करण्यात आला.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
महायुतीने राज्यात सव्वा दोनशेहून अधिक जागांवर विजय मिळवला आहे. या यशाचे मोठे श्रेय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि अजित पवार यांना दिले जात आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी लाडक्या बहिणींसाठी योजना आणली तसेच शेतकऱ्यांसाठी योजना आणल्या व उद्योजक कामगारवर्गासाठी व सर्वसामान्य जनतेसाठी केलेल्या कामामुळे महायुतीला हे यश मिळाले आहे.
या यशाच्या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक सूर्यकांत आप्पा लवटे यांनी पुढील मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेच राहतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली महायुतीने महाराष्ट्रात घवघवीत यश मिळवले असल्याचे ते म्हणाले.
यावेळी माजी नगरसेवक सूर्यकांत लवटे माजी नगरसेवक प्रतापमेहरोलिया कुमार पगारे गिरीश लवटे स्वप्निल लवटे किरण राक्षे संदेश लवटे कुमार लोंढे कारण पार्टी विशाल बागडे करण पारचे नितीन गोयर सुनियान सहाब आधीच पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते