नाशिक: मोटारसायकल चोरीच्या दोन गंभीर गुन्ह्यांची उकल करत नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट क्र. १ ने एका आरोपीला जेरबंद केले आहे. या प्रकरणात दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून, त्यांच्या एकूण किंमती सुमारे १ लाख रुपये आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कार्षिक यांनी शहरातील मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघड करण्यासाठी विशेष आदेश दिले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे उपआयुक्त .प्रशांत बोराटे आणि सहा. पोलीस आयुक्त संदीप मितके यांनी युनिट क्र. १ च्या पथकाला सूचना दिल्या.
गुन्हे शाखेच्या युनिट क्र. १ कडील पथकाला सीबीएस परिसरात एका संशयित व्यक्तीबाबत माहिती मिळाली. त्या आधारे पोलीस उपनिरीक्षक संतोष आव्हाड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गणेशनगर परिसरातून संशयिताला अटक केली. चौकशी दरम्यान, आरोपीकडून हिरो कंपनीची (MH 15 BG 5109) आणि होंडा कंपनीची (MH 15 MS 7752) अशा दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या.
सदर कारवाई पोलीस निरीक्षक मधुकर कड, पोलीस उपनिरीक्षक संतोष आव्हाड, पोलीस हवालदार प्रवीण पवार, उत्तम बाराहाते, अमोल कोष्टी, महिला पोलीस शारदा कोकणे, मनिषा पवार आदींच्या पथकाने केली.
आरोपीला आणि जप्त मुद्देमालाला पुढील कारवाईसाठी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाने केलेल्या या यशस्वी कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.