श्री गणेशोत्सव २०२४- घरगुती पर्यावरणपुरक आरास स्पर्धा. जाहिर आवाहन

images 3

नाशिक महानगरपालिका, नाशिक घनकचरा व्यवस्थापन विभाग

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

श्री गणेशोत्सव २०२४- घरगुती पर्यावरणपुरक आरास स्पर्धा. जाहिर आवाहन

श्री गणेशोत्सव २०२४ चे अनुषंगाने नाशिक महानगरपालिका कार्यक्षेत्रात घरोघरी श्री गणेश मुर्तीची प्रतिष्ठापना करणेत येणार आहे. त्याअनुषंगाने सदरचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा व्हावा याकरीता नाशिक महानगरपालिकेमार्फत विविध उपाययोजना व उपक्रम राबविणेत येत आहेत. तथापि, सदर उपक्रम व उपाययोजनांमध्ये नागरीकांचा देखील सहभाग असावा व त्यांना पारितोषिक देऊन गौरविणेत येऊन इतर नागरीकांना त्यापासून प्रेरणा मिळेल व श्री गणेशोत्सव पर्यावरणपूरक होईल असा महानगरपालिकेचा प्रयत्न आहे.

सबब, श्री गणेशोत्साव २०२४ अनुषंगाने घरोघरी प्रतिष्ठापना करणेत येणाऱ्या श्री गणेश मुर्तीचे अनुषंगाने शाडू मातीपासून किंवा अन्य पर्यावरणपूरक साहित्यांपासून तयार केलेल्या श्री मुर्तीची प्रतिष्ठापना, पर्यावरणपूरक गणेशोत्सव आरास व पर्यावरणपूरक श्री विसर्जन अशा तीनही प्रकारे घरगुती पर्यावरणपूरक श्री गणेशोत्सव साजरा करणाऱ्या नागरीकांना या स्पर्धेत सहभाग घेता येईल. वरील तीनही निकष पूर्ण करणे अनिवार्य असेल. तसेच, श्री विसर्जन हे घरीच पर्यावरणपूरक पध्दतीने करणे आवश्यक आहे. अशा प्रकारे निकष पूर्ण करणाऱ्या उत्कृष्ट तीन सहभागी स्पर्धकांची निवड करून संबंधीतांना पारितोषिक देऊन गौरविणेत येईल. त्यांना देणेत येणाऱ्या पारितोषिकाचे स्वरूप खालील प्रमाणे असेल.

१. प्रथम पारितोषिक:१००००/-

२. द्वितीय पारितोषिक:५०००/-

३. तृतीय पारितोषिक:३०००/-

सबब, नाशिक महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नागरीकांनी सदर स्पर्धेच्या अनुषंगाने शाडू मातीपासून किंवा अन्य पर्यावरणपूरक साहित्यापासून तयार केलेल्या त्यांचे घरातील केलेली पर्यावरणपुरक श्री मुर्तीची प्रतिष्ठापना, पर्यावरणपूरक केलेली श्री गणेशोत्सव आरास व पर्यावरणपूरक पध्दतीने घरीच केलेले श्री विसर्जन इ. सर्वांचे छायाचित्र (फोटो) health nashikcorporation@gmail.com या संकेतस्थळावर अपलोड करावे व त्यानुसार संबंधित विभागीय अधिकारी हे त्यांचे कार्यक्षेत्रातील घरगुती आरासांची प्रत्यक्ष पाहणी करून त्याप्रमाणे वस्तुनिष्ठ अहवाल याकामी गठीत केलेल्या समितीकडे सादर करतील. प्राप्त अहवालांची पडताळणी करून सदर समिती पारितोषिकांबाबत अंतिम निर्णय घेईल.

तरी. जास्तीत जास्त नागरीकांनी या स्पर्धेत सहभागी होऊन श्री गणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा करावा व श्री गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणीत करावा असे नाशिक महानगरपालिकेतर्फे जाहिर आवाहन करणेत येत आहे.

डॉ.आवेश पलोड
संचालक,
घनकचरा व्यवस्थापन विभाग, नाशिक महानगरपालिका

Leave a Reply