Daily Horoscope : “आजचा शुभ दिन: मार्गशीर्ष सप्तमीचे यशस्वी योग आणि राशींचे भविष्य!”

Here is the wide image showcasing the astrological theme with a focus on Margashirsha Krishna Saptami. Let me know if you'd like any adjustments!

रविवार, २२ डिसेंम्बर २०२४. मार्गशीर्ष कृष्ण सप्तमी/अष्टमी. हेमंत/शिशिर ऋतू. क्रोधीनाम संवत्सर.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००

“आज चांगला दिवस आहे” भानू सप्तमी काळाष्टमी.

चंद्रनक्षत्र – उत्तरा (फाल्गुना) आज जन्मलेल्या बाळाची राशी – सिंह/ (दुपारी १२.५६ नंतर) कन्या.

टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.

Daily Horoscope : “आजचा शुभ दिन: मार्गशीर्ष सप्तमीचे यशस्वी योग आणि राशींचे भविष्य!”

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्राचा हर्षलशी त्रिकोण योग आहे. अनुकूल दिवस आहे. अचानक धनलाभ होईल. संततीकडून खुश खबर मिळेल. व्यवसाय वाढेल.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) संमिश्र दिवस आहे. चंद्र अनुकूल आहे. घरगुती कामास प्राधान्य द्याल. लाभदायक घटना घडतील.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) कामाच्या ठिकाणी चांगले अनुभव येतील. व्यापार वृद्धी होईल. समाजीक कार्यास वेळ द्याल.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) बोलताना काळजी घेतल्यास बऱ्याच गोष्टी सुलभ होतील. उत्तरार्ध आर्थिक लाभाचा आहे. घशाचे विकार जाणवतील.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) अनुकूल दिवस आहे. आत्मविश्वास वाढेल. मेजवानी मिळेल. छोटी सहल घडेल. खर्च मात्र वाढेल.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) पूर्वार्ध अनुकल नसला तरी उत्तरार्धात परिस्थिती बदलेल. जमीन व्यवहारात यश मिळेल. सामाजिक कार्यातून मनस्ताप संभवतो.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) पूर्वार्ध चांगला आहे. कामे पूर्ण करून घ्या. नात्यातून लाभ होतील. आर्थिक फायदा होईल. संध्याकाळ विवंचना वाढवणारी असू शकते.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) अनुकूल दिवस आहे. कामाच्या ठिकाणी प्रसंशा होईल. प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. उत्तरार्ध संथ असला तरी आश्वासक असेल.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) सकाळच्या सत्रात महत्वाची कामे पूर्ण करा. प्रगतीची दारे खुली होतील. सत्संग लाभेल. वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) दिवसाची सुरुवात फारशी अनुकूल नाही. आरोग्याच्या तक्रारी निर्माण होतील. सरकारी कामात अडथळे येऊ शकतात. उत्तरार्ध अनुकूल आहे.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) दिवसाची सुरुवात चांगली होणार आहे. नवीन ओळखी होतील. आर्थिक बाजू भक्कम होईल मात्र उत्तरार्ध खर्चात टाकणारा आहे.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) आर्थिक भरभराट करणारा दिवस आहे. मात्र जिभेवर ताबा ठेवावा लागेल. आरोग्याची काळजी घ्या. आराम करा.

कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन.

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521