नाशिक रोड (प्रतिनिधी) – उपनगर पोलिसांनी नाशिक शहरात वाढत्या चैन स्नॅचिंग crime घटनांवर आळा घालत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. एका विना क्रमांकाच्या मोटारसायकलस्वाराला पकडून सखोल चौकशीतून एकूण आठ गुन्ह्यांचा छडा लावण्यात आला आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
नाशिक शहर व परिसरात crime अनेक नागरिकांनी चैन स्नॅचिंगच्या घटनांबाबत उपनगर पोलीस ठाण्यात तक्रारी नोंदवल्या होत्या. या वाढत्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपआयुक्त मोनिका राऊत व सहायक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी यांच्या सूचनेनुसार कारवाई सुरू करण्यात आली.
उपनगर पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने नाकाबंदी करताना विना क्रमांकाच्या पल्सर मोटारसायकलवर दोन संशयितांना पकडले. चौकशीत मोटारसायकल चोरीची कबुली दिली. अधिक तपासात हे विधीसंघर्षित बालक असल्याचे समोर आले.
सखोल चौकशीत संशयितांनी उपनगर पोलीस ठाणे हद्दीत सहा व म्हसरूळ पोलीस ठाणे हद्दीत दोन चैन स्नॅचिंग गुन्ह्यांची कबुली दिली. एकूण ७७.५५० ग्रॅम सोन्याचे दागिने, दोन चोरीच्या मोटारसायकली असा सुमारे ₹७,१८,४०० किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या कारवाईसाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी यांनी मार्गदर्शन केले. गुन्हे शोध पथकाचे प्रभारी अधिकारी प्रभाकर सोनवणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी कामगिरी बजावली.
नाशिक पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, कोणतीही संशयास्पद घटना दिसल्यास तातडीने पोलिसांना कळवावे, असे आवाहन केले आहे.