Nashik : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाच्या ताफ्यात आणखी ६ ई-शिवाई बसेस दाखल झाल्या आहेत. या बसेस लांब पल्ल्याच्या मार्गांसाठी उपयुक्त असून, प्रवाशांना वातानुकूलित आणि आरामदायी प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देणार आहेत.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
E shivai bus नवीन मार्ग आणि सेवा
Nashik – बोरिवली मार्ग: २ बसेस
Nashik – संभाजीनगर मार्ग: २ बसेस
Nashik – सटाणा मार्ग: २ बसेस
बोरिवली मार्गासाठी बस महामार्ग स्थानकातून सुटतील, तर संभाजीनगर आणि सटाणा मार्गावरील बसेस मेळा बसस्थानकातून सुटतील.
सुविधा: वातानुकूलित व्यवस्था, पुशबॅक सीट, चार्जिंग पोर्ट, पॅनिक बटण, रीडिंग लाइट, पूट लाइट, ड्रायव्हिंग असिस्टन्स, आणि पीआयएस डिस्प्ले बोर्ड. पर्यावरणपूरक वाहतूक: बॅटरीवर चालणाऱ्या या बसेस प्रदूषण कमी करण्यात मोलाची भूमिका बजावतील.
सर्व बसेस एका खासगी कंपनीद्वारे भाडेतत्त्वावर असून, बसची देखभाल व चालक व्यवस्थापन यांची जबाबदारीही कंपनीची आहे. चालकांची संपूर्ण चाचणी करूनच त्यांना सेवेत रुजू करण्यात आले आहे.
महामंडळाने दिवाळीच्या मुहूर्तावर १०० ई-शिवाई बसेस ताफ्यात समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. टप्प्याटप्प्याने या बसेस दाखल होत आहेत. सध्या नाशिक विभागात शिवाई बसची संख्या १३ झाली आहे.
ई-शिवाई बसेसच्या सेवेमुळे नाशिककरांना अधिक आरामदायी व पर्यावरणपूरक प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.
He Pan Wacha : New e shivai bus