भारतीय कम्युनिस्ट पक्ष (डावी आघाडी) आणि अखिल भारतीय दलित अधिकार आंदोलनतर्फे नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना गृहमंत्री अमित शहा यांच्या संविधानाचा अवमान केल्याबद्दल निषेधाचे निवेदन सादर. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान, परभणीतील घटनांवर न्यायाची मागणी.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
नाशिकः भारतीय कम्युनिस्ट पक्ष (डावी आघाडी) आणि अखिल भारतीय दलित अधिकार आंदोलनतर्फे नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत गृहमंत्री अमित शहा Amit Shah यांच्यावर संविधानाचा अवमान केल्याचा आरोप करण्यात आला.
गृहमंत्री अमित शहा Amit shah यांनी संसदेत केलेल्या वक्तव्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केल्याचा आरोप करीत त्यांच्या माफीची व राजीनाम्याची मागणी करण्यात आली. तसेच महाराष्ट्रातील परभणी येथे संविधानाच्या प्रतिमेची मोडतोड, पोलिस अत्याचार, आणि कॉम्बिंग मोहिमेत निरपराध युवक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूबाबत न्यायिक चौकशीची मागणीही करण्यात आली.
डावी आघाडीच्या प्रमुख मागण्या:. गृहमंत्री अमित शहा Amit Shah यांचा राजीनामा,संसदेत डॉ. आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागून तत्काळ राजीनामा द्यावा.
परभणीतील घटनांची न्यायिक चौकशी, सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूची सविस्तर चौकशी व्हावी,दलित वस्त्यांवर झालेल्या पोलीस अत्याचारांवर आयोग नेमण्यात यावा,पीडित कुटुंबाला 50 लाख रुपयांची नुकसानभरपाई मिळावी, संविधानाचा अवमान करणाऱ्यांवर कारवाई,परभणीतील संविधान प्रतिमेची मोडतोड करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी.
परभणी शहरातील दलित वस्त्यांमध्ये पोलिसांनी कॉम्बिंग मोहिमेदरम्यान अमानवी अत्याचार केले, ज्यामुळे अनेक तरुणांवर अन्याय झाला. या मोहिमेत सोमनाथ सूर्यवंशी या युवकाचा मृत्यू झाला. या प्रकरणाच्या निषेधार्थ सक्रिय असलेले विजय वाकोडे यांचे हृदयविकाराने निधन झाल्याचेही निदर्शनास आले.
डावी आघाडीने इस्रायली पद्धतींच्या तंत्रज्ञानाचा वापर भारतात पोलिस अत्याचारांसाठी होत असल्याची शंका व्यक्त केली.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव महादेव खुडे, रफीक सैय्यद, दिनेश वाघ, राहुल भुजबळ, प्राजक्ता कापडणे, आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
He Pan Wacha: हिंदु धार्मिक संघटना व भाजपच्या वतीने शरद पवारांच्या विरोधात निषेध आंदोलन.