Satpur : सातपूरमध्ये किरकोळ वादातून तरुणावर हल्ला: मद्याच्या बाटलीने मारहाण, गुन्हा दाखल

सातपूरमध्ये किरकोळ वादातून तरुणावर हल्ला: मद्याच्या बाटलीने मारहाण, गुन्हा दाखल

नाशिकः सातपूर Satpur येथील रतन वाइन शॉपसमोर एका तरुणाला मारहाण झाल्याची घटना रात्री सव्वाआठ वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी सागर सुधाकर वाघुळकर (३०, रा. वडारवाडी) यांच्या फिर्यादीवरून हेमंत सोनवणे (रा. स्वारबाबा नगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

फिर्यादीनुसार, सागर वाघुळकर पायी जात असताना किरकोळ धक्का लागल्याच्या कारणावरून हेमंत सोनवणे याने वाद घालत मद्याच्या बाटलीने मारहाण केली. या घटनेत सागर वाघुळकर गंभीर जखमी झाले आहेत.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अधिक तपास सुरू केला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.