Nashik : एमआयडीसी प्रादेशिक अधिकारीपदावर वाद: न्यायाधिकरणाची सुनावणी सुरू

Nashik MIDC

नाशिक: एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारीपदाच्या वादावर प्रशासकीय न्यायाधिकरणात सुनावणी सुरू असून सोमवारी (दि. २५) गणेश राठोड यांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले. या प्रकरणावर मंगळवारी (दि. २६) पुन्हा सुनावणी होणार आहे, त्यानंतर निकाल लागण्याची शक्यता आहे.

नाशिक एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी यांच्या बदलीनंतर गणेश राठोड यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, त्यांची प्रत्यक्ष नियुक्ती न करता दीपक पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. नंतर पाटील यांना जालना येथे तहसीलदार म्हणून परत पाठवण्यात आले. गणेश राठोड यांनी या निर्णयाविरोधात प्रशासकीय न्यायाधिकरणाचा दरवाजा ठोठावला आहे.

दरम्यान, सध्या या पदाचा प्रभारी कार्यभार स्थानिक अधिकाऱ्यांकडे असून ते ३० डिसेंबर रोजी निवृत्त होणार आहेत. त्यामुळे वेळेत निर्णय झाला नाही, तर पुढील जबाबदारी कोणाकडे सोपवली जाईल, हा चर्चेचा मुद्दा बनला आहे.