Daily Horoscope : आजचा दिनविशेष : मार्गशीर्ष कृष्ण अष्टमीचे शुभ संकेत! 08 Jan 2025

/daily-horoscope-aajcha-dinv-ishesh/

बुधवार, 8 जानेवारी 2025. पौष शुक्ल नवमी

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

राहुकाळ – दुपारी 12 ते 1:30

“आज उत्तम दिवस आहे.

आजचे राशिभविष्य आणि
8 जानेवारी रोजी जन्मलेल्यांमध्ये वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुमच्यावर शनि या ग्रहाचे वर्चस्व आहे.
तुम्ही दृढ निश्चयी, कडक शिस्तीचे ,स्थिर,कर्तव्यतत्पर आहात. शांतता व एकांत प्रिय आहे.तुम्हाला गंभीर रहाणे आवडते. शास्त्रीय संगीत, फुले रम्य देखावे, निसर्ग यांची तुम्हाला आवड आहे. तुम्हाला एकांत प्रिय आहे. तुम्ही समतोल विचार करणारे आहात. तत्वज्ञान आणि अध्यात्म यांची तुम्हीयोग्य सांगड घालू शकतात. भविष्याची आखणी तुम्ही काळजीपूर्वक करतात. तुम्ही अतिशय कष्टाळू आहात. आणि ध्येयपूर्तीसाठी झपाटलेले असतात. इतरांकडून काम करून घेणे तुम्हाला चांगले जमते. कामात सातत्य असले तरी काही अडचणी आणि कामात विलंब याचा तुम्हाला वारंवार अनुभव येतो.
तुमच्याकडे योग्य तर्हेने व्यवस्था पन करण्यासाठी लागणार दरारा आणि वचक,जोर आहे. आर्थिक नियोजन उत्तम जमते. इतरांच्या समस्या तुम्ही योग्य तर्हेने समजून घेऊ शकतात आणि त्यावर तुम्ही बरोबर सल्ले देतात. तुमच्या कामाचे श्रेय अनेकदा हिरावून घेतले जाते.कार्यक्षम असून अधिकार गाजवणारे आहात. हवी असलेली गोष्ट मिळवण्यासाठी कष्ट घेण्याची तयारी असते.गरीब दुबळ्या लोकांच्या विषयी कणव असते. कर्तबगार असून वागण्यात पद्धतशीर असता.कौटुंबिक सुखाचा उपभोग घेणाऱ्या ,मुले व नवरा यांच्या महत्वाकांक्षेसाठी त्याग करणाऱ्या आहात. स्त्रीसुलभ प्रेम किंवा मृदुपणा कमीच असतो.सामाजिक संपर्क असल्याने घरी येणारे जाणाऱ्यांची संख्या बरीच असते.कोणत्याही रुढीचे बंधन आवडत नाही.चांगली पत्नी म्हणून तुमचे कौतुक होते. अल्लड स्वभावामुळे प्रेमात अडचणी येऊ शकतात.जे कल्पक,कार्यक्षम, बुद्धिमान आहेत त्यांच्या शी चटकन मैत्री होते.
शुभ दिवस – बुधवार, शुक्रवार, शनिवार.
शुभ रंग – राखाडी.
शुभ अंक – 4, 8, 9.

आजचे राशिभविष्य

मेष:- आज चंद्र शुक्र लाभ योग सर्व भौतिक सुखे प्रदान करतील.मनस्वास्थ उत्तम राहील. मातेकडूनलाभ होईल. आर्थिक चिंता दूर होईल.

वृषभ:- आज चन्द्र व्यय स्थानी आहे. स्वतःसाठी वेळ द्याल,खर्च कराल.काही सुखद क्षण वाट्यास येतील.

मिथुन:- आज लाभस्थानी चन्द्र आहे.सर्वप्रकारचे लाभ होतील.शब्दास मान मिळेल. आर्थिक बाजू बळकट होईल. मौल्यवान खरेदी होईल. विवाह इच्छुकांना खूष खबर मिळेल.

कर्क:- आज अंदाज अचूक ठरतील.नोकरी/ व्यवसायात प्रगती होईल. .काहींना छोट्या भेटवस्तु,बोनस,पगारवाढ किंवा बक्षीस मिळू शकते. अचानक एखादे काम मार्गी लागेल.

सिंह:- आज भाग्यातला चन्द्र भाग्योदय घडवेल.वाहन सुख लाभेल. नवीन खरेदी होईल. प्रवासाचे बेत ठरतील.

कन्या:- आज अष्टमात असलेला चन्द्र आर्थिक आवक वाढेल.स्रीधनात वाढ होईल.
काही छान गोष्टी घडतील.

तुळ:- आज सार्वजनिक ठिकाणी संभाषण कौशल्याने लाभ होईल. महिलांना पतीकडून दागिन्यांचा लाभ होऊ शकतो.

वृश्चिक:- आज नोकरीत बढती मिळू शकते.प्रवास घडतील.आर्थिक प्राप्ती त वाढ होईल.शत्रू नाश होईल.

धनु:- आज नवीन संधी चालून येतील.रोमॅण्टिक दिवस अनुभवाल .आवडत्या व्यक्तिची भेट होईल. अनपेक्षित धनलाभाची शक्यता.

मकर:- आज सरकार कडून लाभ होतील.घरगुती वातावरण शांत ठेवा.आरोग्यासाठी खर्च होईल.

कुंभ:- आज.नोकरी/व्यवसायात विरुद्ध लिंगी व्यक्तीकडून लाभ होतील. कामाचा उत्साह वाढेल. नवीन संधी चालून येतील.जवळचे प्रवास घडतील.नशिबाची साथ लाभेल.

मीन:- आज नात्यातून लाभ होतील.गोड बोलण्याने लाभ होतील.कंजूष पणा कडे कल राहील.


सौ मधुरा मंगेश पंचाक्षरी नाशिक मोबाईल-9272311600
लग्न ,करियर, गुण मीलन विषयी
सशुल्क पत्रिका पाहण्यासाठी संपर्क करावा.