आजचे राशिफल ज्योतिष:-
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
शनिवार, 11 जानेवारी 2025. पौष शुक्ल द्वादशी/त्रयोदशी
राहुकाळ – सकाळी 9 ते 10:30
“आज क्षय तिथी आहे.शनीप्रदोष
11 जानेवारी रोजी जन्मलेल्यांमध्ये वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
तुमच्यावर चंद्र आणि शनि या ग्रहाचे वर्चस्व आहे.
जीवनात व प्रेमात तुम्ही यशस्वी होता. त्याचप्रमाणे मानसन्मान सत्ता व अधिकार मिळतो .तुम्ही तुमच्या मित्रांशी प्रामाणिक राहता .तुमच्या गुप्त शत्रूंपासून तुम्ही नेहमी सावध राहणे महत्त्वाचे आहे.गुढवाद, तत्वज्ञान, शास्त्र या विषयाकडे अधिक ओढा असून प्रवास आदर व इतरांकडून मदतही जीवनात मिळते. तुम्ही फार लवकर भावना वश होता. लहान सहान गोष्टीत सुद्धा काळजी करण्याचा स्वभाव असतो. तुमच्यापासून इतरांना स्फूर्ती मिळते. लवकरात लवकर निर्णय घेण्याची देणगी तुमच्याकडे तुम्हाला लाभलेली असते .तुम्ही खूप श्रम करण्याच्या विरुद्ध असला तरी आर्थिक स्थिती समाधानकारक असते तुम्ही प्रेमळ व निष्ठावान असता .तुम्ही जरी लहरी व हळव्या स्वभावाचे असल्या तरी पतीच्या गरजा पूर्ण करता. तुम्ही बुद्धिमान व हुशार असून परिस्थितीशी उत्तम जुळवून घेता. तुमच्या अपेक्षा मोठ्या असून तुमच्या पती त्याचा फावला वेळ कसा घालवतो यात तुम्हाला रस नसतो .ज्या व्यक्तींमध्ये उद्योगीपणा व बुद्धिमत्ता आहे अशांकडे तुम्ही आकर्षित होता. तुमच्याकडे उत्कृष्ट कल्पनाशक्ती असून ध्येयवादी व स्वप्नाळू स्वभावाच्या असतात.
शुभ दिवस-सोमवार, मंगळवार,शुक्रवार
शुभ रंग-पांढरा, जांभळा
शुभ रत्न-मोती,हिरे
( कुंडली तपासूनच रत्न वापरावे)
आजचे राशिभविष्य
मेष:- आज प्रतिकूल दिवस.कमीतकमी बोला.महत्वाची कामे पुढे ढकला.
वृषभ:- आज तुमच्याच राशीत चन्द्र आहे.आत्मविश्वास वाढेल.सुरुची भोजनाचा लाभ घ्याल.आर्थिक दृष्टीने चांगला.
मिथुन:- आज व्यय स्थानी चन्द्र आहे. आर्थिक लाभ होतील.वाहन जपुन चालवा.दानधर्म कराल.
कर्क:- आज लाभात चन्द्र आहे. पाहुणे येतील. नवीन खरेदी होईल.अचानक लाभ होतील.
सिंह:- आज अंदाजाने कामे करू नयेत.नोकरीत संमिश्र दिवस.व्यवसायात वाढ होईल.घरगुती कामात व्यस्त रहाल.
कन्या:- आज पूर्वजांचा आशीर्वाद पाठीशी राहील.प्रवास घडतील.आरोग्याकडे लक्ष द्या.पाणथळ जागे पासून धोका होऊ शकतो.
तुळ:- आज पूर्व कर्माची फळे मिळतील.नैतिक मार्ग अवलंबावा. व्यक्त होताना काळजी घ्यावी.
वृश्चिक:- आज आवडत्या व्यक्ती सोबत जलपर्यटन घडेल.पतीचे सहकार्य मिळेल.कामात यश.
धनु:- आज संमिश्र दिवस आहे.भरभराट होईल.कामाच्या ठिकाणी चांगले अनुभव येतील.
मकर:- आज प्रगतीकर दिवस आहे. संतती कडून समाधानकारक बातमी मिळेल.उत्साह वाढेल.
कुंभ:- आज शनी चन्द्र केंद्र योग आहे.घरगुती कामे निपटाल.विचारपूर्वक कामे करा.
मीन:- आज छोटे प्रवास घडतील.सृजनशीलता दिसेल.उत्साहित रहाल.
सरकारी कामे रेंगाळतील.
सौ मधुरा मंगेश पंचाक्षरी नाशिक
मोबाईल-9272311600
लग्न ,करियर, गुण मीलन विषयी
सशुल्क पत्रिका पाहण्यासाठी संपर्क करावा.