Central Kitchen Scam
: आदिवासी विद्यार्थ्यांसाठी बुरशीयुक्त अन्न, न्यायाची आशा मावळली

Hiraman khoskar central kitchen karwai

नाशिक, इगतपुरी: मुंडेगाव येथील सेंट्रल किचनद्वारे central kitchen आदिवासी विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या अन्नाच्या दर्जावर मोठा वाद निर्माण झाला आहे. बुरशी लागलेले अन्न आणि किडीचे धान्य या गंभीर आरोपांवरून इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांनी थेट आदिवासी विकास विभागाचे लक्ष वेधले आहे. मात्र, चौकशीसाठी नेमलेल्या उपायुक्त सुदर्शन नगरे यांच्याच विभागीय चौकशीने वाद अधिकच चिघळला आहे.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

चौकशीच्या प्रक्रियेवर शंका
आ. खोसकर यांच्या म्हणण्यानुसार, नगरेंचीच विभागीय चौकशी सुरू असल्यामुळे या प्रकरणात न्याय मिळण्याची शक्यता धूसर आहे. याच पार्श्वभूमीवर, खोसकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी स्वतंत्र आणि निष्पक्ष अधिकारी नेमण्याची मागणी केली आहे.

विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोका
आदिवासी विद्यार्थ्यांना शिळे, बुरशीयुक्त आणि निकृष्ट दर्जाचे अन्न दिले जात असल्याच्या तक्रारी आमदार खोसकर यांना सातत्याने मिळत आहेत. सेंट्रल किचन central kitchen व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

न्यायासाठी अजित पवारांकडे आशा
“आदिवासी विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोका पोहोचणाऱ्या सेंट्रल किचन central kitchen व्यवस्थापनाची चौकशी योग्य आणि निष्पक्ष पद्धतीने व्हावी,” अशी मागणी करून खोसकर यांनी उपमुख्यमंत्र्यांकडे या प्रकरणी न्याय मिळवून देण्याची विनंती केली आहे.

सरकारच्या भूमिकेकडे लक्ष
या प्रकरणामुळे आदिवासी विकास विभाग तसेच राज्य सरकारवर मोठा ताण निर्माण झाला आहे. आता अजित पवार या प्रकरणात कसा हस्तक्षेप करतात आणि योग्य कारवाई होते का, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.