Prayagraj Kumbh Mela: प्रयागराज महाकुंभमध्ये चेंगराचेंगरी: अनेक जखमी, मुख्यमंत्री योगींची त्वरित प्रतिक्रिया (Yogi Adityanath)

Prayagraj Kumbh Mela Stampede at Sangam Ghat

Prayagraj Kumbh Mela: उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये आयोजित महाकुंभ मेळ्याच्या (Prayagraj Kumbh Mela) निमित्ताने आज एक दुर्दैवी चेंगराचेंगरीची घटना घडली. मौनी अमावस्या निमित्त हजारोंच्या संख्येने आलेल्या भाविकांच्या गर्दीमुळे संगम घाटावर हा अपघात झाला. यामध्ये अनेक भाविक जखमी झाले असून, काहींना गंभीर इजा पोहोचली आहे. मृतांची संख्या अद्याप स्पष्ट करण्यात आलेली नाही, पण मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

योगी आदित्यनाथ ((Yogi Adityanath)) यांनी सांगितले की, “संगम घाटावर अत्यधिक गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली. यामध्ये काही भाविक गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रशासन घटनास्थळी सक्रिय आहे आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.”

त्यांनी पुढे सांगितले की, “घटना रात्री १ ते २ वाजता घडली. घाटावर बॅरिकेट्स लावण्यात आले होते, मात्र त्या तुटल्यामुळे तीव्र दुर्घटना घडली. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे, आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी घटनेची माहिती घेतली आहे.”

योगी आदित्यनाथ यांनी नागरिकांना संयम ठेवण्याचे आवाहन केले आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे सांगितले. “संगम घाटावर विविध घाटांवर स्नानाची सुविधा उपलब्ध आहे. कृपया गर्दी कमी करण्यासाठी जवळच्या घाटांवर स्नान करा,” असं ते म्हणाले.

महाकुंभ मेळ्याच्या आयोजनात प्रशासन सज्ज असून, त्यासाठी उच्चस्तरीय बैठक देखील सुरू करण्यात आली आहे, ज्यामध्ये राज्याचे मुख्य सचिव, डीजीपी आणि मुख्यमंत्री कार्यालयाचे अधिकारी सहभागी आहेत.