महानगरपालिका शिक्षण विभागाचे उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

WhatsApp Image 2024 09 09 at 4.22.49 PM

नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागातील २० पुरस्कार आज नाशिकचे पालकमंत्री नामदार दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली व नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉ.श्री.अशोक करंजकर, अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, उपायुक्त श्रीकांत पवार,शिक्षणाधिकारी बी टी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कालिदास कलामंदिरात मोठ्या उत्साहात पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.
सोहळ्याची सुरुवात ईशस्तवन व स्वागत गीताने उपशिक्षिका श्रीमती उशीर यांनी केली.दीपप्रज्वलानंतर नाशिक महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी यांनी कार्यक्रमाची प्रस्ताविक केले. प्रस्ताविकामध्ये त्यांनी नाशिक महानगरपालिकेचा गुणवत्तेचा आलेख गेल्या वर्षभरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढला असून विद्यार्थी संख्या मागच्या वर्षाच्या तुलनेत वाढली असल्याचे नमूद करून विविध नवनवीन उपक्रम नाशिक महानगरपालिकेमध्ये राबवली जात असल्याचे आवर्जून उल्लेख केले. मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा उपक्रमात गेल्या वर्षी नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील चार शाळांनी पारितोषिक प्राप्त केली असून स्कॉलरशिप मध्ये देखील विद्यार्थिनी उल्लेखनीय कामगिरी केल्याचे नमूद केले.
मा. पालकमंत्री महोदय यांनी मागील वर्षाच्या तुलनेत नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील मनपा शाळांचा दर्जा व पटसंख्या निश्चित उंचावला असून आता अधिक जोमाने अजून काम करण्याची आवश्यकता असल्याचे नमूद करून उत्कृष्ट पारितोषिक प्राप्त शिक्षकांचे अभिनंदन करून नवनवीन उपक्रम व विद्यार्थी हिताचे कार्यक्रम राबवून नाशिक महानगरपालिकेचे नाव अजून उंच करावे. तसेच सुपर फिफ्टी या अभियानांतर्गत गोरगरिबाच्या मुलीने अतिशय उत्कृष्ट कामगिरी करून नावलौकिक कमावल्याचे यावेळी त्यांनी नमूद केले. सात ते नऊ मोबाईल बंदी व दप्तर मुक्त शनिवार या अभियानाची राज्यभारामध्ये दखल घेतल्याबद्दल पालकमंत्र्यांनी कौतुक करून विशेष अभिनंदन ही केले. नाशिक महानगरपालिकेच्या शाळेमध्ये माझी दिवंगत बहीण शिक्षिका होती याचे स्मरण करताच पालकमंत्र्यांना गहिवरून आले व इथून पुढच्या काळामध्ये उपस्थित असणाऱ्या ७५% महिला या माझ्या बहिणी असून त्यांच्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याच आश्वासन पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

यानंतर नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागातील,मनपा व खाजगी शाळांचे मुख्याध्यापक,शिक्षक शिक्षिका, विशेष पुरस्कार २ असे एकूण २० पुरस्कार पालकमंत्री भुसे व आयुक्त डॉ.करंजकर यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.शाळा पटसंख्या वाढ, शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत विद्यार्थाचे यश, साक्षर सर्वेक्षण, शाळा बाह्य मुलांचे सर्वेक्षण, विविध नवोपक्रम, सायंकाळी ७ते ९ वाजेपर्यंत मोबाईल बंद उपक्रम, दप्तर मुक्त शनिवार अभियानाची प्रभावी अंमलबजावणी या आधारे निवड करून सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमासाठी नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील मनपाच्या ९० शाळा व माध्यमिक विभागाचे बारा शाळांची शिक्षक शिक्षिका उपस्थित होते.
कार्यक्रम प्रसंगी नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील २४ केंद्रातील केंद्र, विविध संघटनेचे पदाधिकारी,खाजगी संघटनेचे पदाधिकारी, सर्व शिक्षा अभियान कर्मचारी अंशकालीन कर्मचारी, उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केंद्र प्रमुख वैशाली क्षीरसागर, मंगेश पाठक यांनी केले तर आभार सुनील केळकर यांनी मानले.

Leave a Reply