राज्यातील लाडक्या बहिणींसाठी मोठी आणि महत्त्वाची बातमी
लाडकी बहीण योजनेतील (Ladki Bahin Yojana) फेब्रुवारीचा हप्ता वेळेच्या आधीच मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फेब्रुवारीचा हप्ता उद्यापासून द्यायला सुरुवात होणार आहे. यासाठी वित्त विभागाकडून (Finance Department) 3490 कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहेत.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
अनेक महिला अपात्र ठरण्याची शक्यता
लाडकी बहीण योजनेच्या (Ladki Bahin Yojana) फेब्रुवारी महिन्यातील हप्त्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. डिसेंबर अखेर 2 कोटी 46 लाख महिला लाभार्थी होत्या. त्यातील 5 लाख महिला अपात्र झाल्यानंतर जानेवारी अखेर 2 कोटी 41 लाख लाभार्थी महिला होत्या. मात्र, फेब्रुवारी अखेरच्या आकडेवारीनुसार, अजूनही काही महिला अपात्र ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
9 लाख महिलांची नाव कमी होणार?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून (Ladki Bahin Yojana) अपात्र ठरलेल्या महिलांची संख्या 9 लाखांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. यापूर्वी 5 लाख महिलांची नावे योजनेतून वगळण्यात आली होती. आता अजून 4 लाख महिलांची संख्या कमी होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
लाडकी बहीण आणि नमो शेतकरी योजनेतील लाभार्थ्यांवर परिणाम
राज्यातील 5 लाख महिलांना लाडकी बहीण योजनेतून (Ladki Bahin Yojana) केवळ 500 रुपये मिळणार आहेत, तर नमो शेतकरी योजनेतून 1000 रुपये मिळणार आहेत. तसेच, दिव्यांग विभागातून लाभ घेणाऱ्या महिलांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे. वाहनधारक अडीच लाख महिलांनाही योजनेच्या लाभातून वगळण्यात आले आहे.
कोणत्या महिलांना लाभ मिळतो?
राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीच्या आधी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही महत्त्वाकांक्षी योजना राबवली होती. योजनेच्या अंतर्गत 21 ते 65 वयोगटातील महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात. मात्र, त्यासाठी खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे:
- वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावे.
- लाभार्थी महिलांच्या नावावर वाहन किंवा इतर मोठी मालमत्ता नसावी.
- इतर शासकीय योजनांचा लाभ घेत असलेल्या महिलांना संपूर्ण लाभ मिळणार नाही.
राज्य सरकारची मोठी बचत
महिलांची संख्या कमी झाल्यामुळे राज्य सरकारला 945 कोटी रुपयांची बचत होणार आहे. त्यामुळे हा निर्णय अर्थसंकल्पीय दृष्टिकोनातून महत्त्वाचा ठरू शकतो.