Traffic and Power Block : पाचोरा यार्ड रीमॉडेलिंगसाठी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक; काही गाड्या रद्द, काही वेळ बदलून सुटणार. (Railway Block)

download 2

Railway Block: भुसावळ विभागातील पाचोरा येथे यार्ड रीमॉडेलिंगच्या कामासाठी प्री-नॉन इंटरलॉकिंग (फेज-II) आणि नॉन इंटरलॉकिंग कार्यानिमित्त विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक (Railway block)घेण्यात येणार आहे. या कामांमुळे काही गाड्या रद्द करण्यात येणार असून, काही गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

रद्द झालेल्या गाड्या:

➡ 01 फेब्रुवारी 2025 रोजी:

गाडी क्रमांक ०१२११ बडनेरा – नाशिक एक्सप्रेस

गाडी क्रमांक ०१२१२ नाशिक – बडनेरा एक्सप्रेस

गाडी क्रमांक ११११३ देवळाली – भुसावळ एक्सप्रेस

गाडी क्रमांक ११११४ भुसावळ – देवळाली एक्सप्रेस

➡ 04 फेब्रुवारी 2025 रोजी:

गाडी क्रमांक ०१२११ बडनेरा – नाशिक एक्सप्रेस

गाडी क्रमांक ०१२१२ नाशिक – बडनेरा एक्सप्रेस

गाडी क्रमांक ११११३ देवळाली – भुसावळ एक्सप्रेस

गाडी क्रमांक ११११४ भुसावळ – देवळाली एक्सप्रेस

पुनः निर्धारित गाड्या (04 फेब्रुवारी 2025 रोजी):

१२८५९ मुंबई – हावडा गीतांजली एक्सप्रेस ०२.०० तास उशिराने सुटेल.

२२१२९ लोकमान्य टिळक टर्मिनस – अयोध्या कॅट एक्सप्रेस ०२.०० तास उशिराने सुटेल.

१५०१७ लोकमान्य टिळक टर्मिनस – गोरखपूर एक्सप्रेस ०१.०० तास उशिराने सुटेल.

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना सहकार्याची विनंती केली आहे, तसेच या यार्ड रीमॉडेलिंगमुळे भविष्यात अधिक सुरक्षित आणि सुकर रेल्वे सेवा उपलब्ध होणार असल्याचे सांगितले आहे.