२४ तासांत ८० मिलियन (80 million views) व्ह्यूजसह टॉप २ मध्ये पोहोचले गाणे
अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेही (Nora Fatehi)आपल्या अप्रतिम डान्स मूव्हजसाठी ओळखली जाते. नुकतेच तिचे अमेरिकन सिंगर जेसन डेरुलो सोबत नवीन गाणे ‘स्नेक’ रिलीज झाले असून, इंटरनेटवर प्रचंड धुमाकूळ घालत आहे. हे गाणे केवळ २४ तासांत जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक पाहिले गेलेले गाणे ठरले आहे.
‘स्नेक’ ला मिळाली अभूतपूर्व लोकप्रियता
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘स्नेक’ ने रिलीजच्या केवळ २४ तासांत ८० मिलियनपेक्षा अधिक व्ह्यूज मिळवले आहेत. हे गाणे सध्या केवळ रोजे आणि ब्रुनो मार्सच्या चार्ट-टॉपिंग गाण्यानंतर दुसऱ्या स्थानी आहे.
यूट्यूबवर टॉप ४ म्युझिक व्हिडीओ लिस्ट मध्ये स्थान मिळवलेले हे गाणे ग्लोबल स्तरावरही मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाले आहे.
नोरा फतेहीची (Nora Fatehi) प्रतिक्रिया
या विशेष यशाबद्दल नोरा फतेही (Nora Fatehi) ने एका मीडिया मुलाखतीत आनंद व्यक्त करत म्हटले:
“हे माझ्यासाठी पूर्णपणे अविश्वसनीय आहे. ‘स्नेक’ चे ग्लोबल टॉप २ वर पोहोचणे माझ्या आणि माझ्या टीमसाठी एक खूप खास क्षण आहे. ब्रुनो मार्स आणि रोजे सारख्या कलाकारांसोबत या यादीत असणे अभिमानास्पद आहे. हे दाखवते की लोक माझ्या आंतरराष्ट्रीय संगीत कारकिर्दीला स्वीकारत आहेत आणि ग्लोबल दृष्टिकोनासोबत जोडले जात आहेत. मी या गाण्यात मनापासून मेहनत घेतली असून, संपूर्ण जग त्याच्याशी जोडले जात आहे, हे पाहून खूप आनंद होत आहे.”
यशासोबत दबावही येतो: नोरा
नोरा पुढे म्हणाली की, प्रत्येक यशासोबत एक नवीन अनुभवही मिळतो. ती म्हणाली:
“नक्कीच, यशासोबत थोडा दबाव जाणवतो. पण मी त्याला प्रेरणादायक म्हणून स्वीकारते. मी नेहमी पुढे जाण्याचा आणि माझ्या चाहत्यांसाठी काहीतरी नवीन सादर करण्याचा प्रयत्न करते. हे ग्लोबल यश मला आणखी मोठे आणि चांगले करण्याची ऊर्जा देते. हे माझ्या करिअरच्या नव्या पर्वाची सुरुवात आहे.”
चाहत्यांना आवडली नोरा आणि डेरुलोची केमिस्ट्री
चाहत्यांनी नोरा फतेही (Nora Fatehi) आणि जेसन डेरुलो यांच्या केमिस्ट्रीचे जोरदार कौतुक केले आहे. सोशल मीडियावर या गाण्याची क्रेझ मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. नोरा ची स्क्रीन प्रेझेन्स आणि डेरुलोसोबतची अप्रतिम केमिस्ट्री प्रेक्षकांनी खूप आवडली आहे.
नोरा फतेही आणि जेसन डेरुलो यांचे ‘स्नेक’ गाणे एक मोठे ग्लोबल हिट ठरले आहे. हे गाणे रिलीज होताच जगभरात चर्चेचा विषय बनले. नोरा ची आंतरराष्ट्रीय लोकप्रियता सतत वाढत आहे आणि तिच्या चाहत्यांना तिला आणखी मोठ्या स्तरावर पाहण्याची उत्सुकता आहे.