मुंबई : अखेर प्रतीक्षा संपली! ‘द फॅंटॅस्टिक फोर (Fantastic four): फर्स्ट स्टेप्स’चा पहिला ट्रेलर प्रदर्शित झाला असून, चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. अनेक प्रयत्नांनंतर ‘मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स’मध्ये (MCU) पहिल्यांदाच ‘फॅंटॅस्टिक फोर’ चित्रपट दाखल होत आहे. विशेष म्हणजे, हा चित्रपट मार्व्हल स्टुडिओचा पहिला ‘फॅंटॅस्टिक फोर’ प्रोजेक्ट आहे, जो या फ्रँचायझीसाठी एक मोठा टप्पा मानला जात आहे.
Fantastic four ट्रेलरमधून मिळाले रोमांचक संकेत
ट्रेलर आधीच लाँच झालेल्या टीझरने चाहत्यांची उत्सुकता ताणली होती. पूर्वी मार्व्हल स्टुडिओवर ट्रेलर्समध्ये खूप काही उघड करण्याचा आरोप झाला होता, मात्र यावेळी त्यांनी गोष्टी गुप्त ठेवत चाहत्यांना अधिक जिज्ञासू बनवले. टीझरमध्ये क्लासिक कॉमिक बुक क्षणांना उजाळा देण्यात आला होता, ज्यामुळे जुन्या चाहत्यांना विशेष आनंद झाला.
युनिक लॉन्च इव्हेंटने जिंकले मन
ट्रेलर रिलीजच्या काही तास आधी अमेरिकेतील ‘यू.एस. स्पेस अँड रॉकेट सेंटर’मध्ये रॉकेटशिप काउंटडाउन ठेवण्यात आला. यावेळी चित्रपटातील मुख्य कलाकार पेड्रो पास्कल (रीड रिचर्ड्स), व्हॅनेसा किर्बी (स्यू स्टॉर्म), एबोन मॉस-बाचराच (बेन ग्रिम) आणि जोसेफ क्विन (जॉनी स्टॉर्म) यांची उपस्थिती होती. या अनोख्या पद्धतीमुळे ट्रेलरबद्दल प्रचंड चर्चा रंगली.
चित्रपटाच्या प्रदर्शनाची तयारी जोरात
‘द फॅंटॅस्टिक फोर(fantastic four): फर्स्ट स्टेप्स’ हा चित्रपट २५ जुलै २०२५ रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. यात पेड्रो पास्कल, व्हॅनेसा किर्बी, एबोन मॉस-बाचराच आणि जोसेफ क्विन यांच्या प्रमुख भूमिका असून, ज्युलिया गार्नर (सिल्व्हर सर्फर) आणि राल्फ इनसन (गॅलेक्टस) हे देखील विशेष भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा असून, हा चित्रपट ‘फॅंटॅस्टिक फोर’च्या चाहत्यांसाठी खास ठरणार आहे.