मा. डॉ. पी.पी. वावा, सदस्य राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग, भारत सरकार, नवी दिल्ली यांची आज सफाई कर्मचारी यांचे विविध प्रश्नांसंदर्भात नाशिक महानगरपालिका येथे बैठक दि.०९/०९/२०२४ रोजी आयोजीत करण्यात आलेली होती. सदर बैठकीचे वेळी नाशिक मनपाच्या स्मिता झगडे, अतिरिक्त आयुक्त (सेवा), मालेगाव महानगरपालिकेचे आयुक्त रविंद्र जाधव, नाशिक मनपाचे शहर अभियंता, उप आयुक्त (प्रशासन), मुख्य लेखा व वित्त अधिकारी, मुख्य लेखापरिक्षक, उप आयुक्त (समाज कल्याण) तसेच नाशिक जिल्हातील नगरपालिका यांचे मुख्याधिकारी व इतर अधिकारी तसेच विविध कामगार संघटना यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
सदर बैठकीचे वेळी डॉ. आवेश पलोड, संचालक, घनकचरा व्यवस्थापन विभाग यांनी प्रास्तविक केले. स्मिता झगडे, अतिरिक्त आयुक्त (सेवा) यांनी मागील बैठकीचे इतिवृत्ता नमूद मुद्यांबाबत मा. सदस्य यांना माहिती दिली. सदर बैठकीच्या वेळी कामगार संघटनांचे प्रतिनिधी यांनी सफाई कामगारंचे विविध मागण्यांबाबत चर्चा केली. सफाई कर्मचा-यांना मोफत घरे देणे, सफाई कर्मचा-यांना दुसरा, चौथा शनिवार, सार्वजनीक सुटीचे दिवशी केलेल्या जादा कामाचा मोबदला देणे, ज्या हजेरी शेड येथे शौचालय नाही तेथे व्यवस्था करणे, लाड पागे समितीचे शिफारशी नुसार सफाई कामगारांचे वारसांना मनपा सेवेत सामावून घेणे, मेघवाळ, मेहतर, बाल्मीकी या जातीचे लोकांना प्राधान्याने सवेते घेणे, सफाई कर्मचारी यांची तसेच त्यांचे कुटुंबाची नियमितपणे वैद्यकिय तपासणी करणे, सफाई कामगारांना गणवेशासाठी देण्यात येणारी रक्कम वाढविणे, मनपाचे स्लम भागात असलेले टॉयलेट अत्याधुनिक करणे, सफाई कामगारांचे वारसांना शैक्षणिक पात्रतेनुसार नियुक्त्या देणे, सफाई कामगारांना नियुक्त्या देतांना जात वैध ता प्रमाणपत्राची अट वगळणे, सफाई कर्मचारी यांचे वेतन दर महिन्याच्या १ तारखेला अदा करणे इत्यादी विविध मागण्यांबाबत बैठकीत चर्चा झाली.
या बैठकीस मनपाचे सर्व विभागप्रमुख उपस्थित होते