Kathe Galli curfew imposed : नाशिक: काठे गल्लीतील अनधिकृत धार्मिक स्थळावर महापालिकेची कारवाई, जमावबंदी लागू

Nashik: Municipal Corporation takes action on an unauthorized religious site in Kathe Galli, curfew imposed.

नाशिक – पुणे रोडवरील काठे गल्लीतील वाद पेटण्याची शक्यता

नाशिक (Kathe Galli ) – पुणे रोडवरील काठे गल्ली (Kate Galli) परिसरातील एका अनधिकृत धार्मिक स्थळावर महापालिकेच्या (Nashik NMC) कारवाईला सुरुवात झाली आहे. तब्बल 25 वर्षे पाठपुरावा करूनही हे धार्मिक स्थळ हटवले जात नसल्याने हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर, महापालिका प्रशासनाने काठे गल्ली परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवत कारवाई सुरू केली आहे.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

Kathe Galli : कायदा व सुव्यवस्थेसाठी जमावबंदी आदेश

शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून नाशिक पोलिसांनी (Nashik Police) मुंबई नाका व भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काठे गल्लीसह द्वारका भागात शनिवारी जमावबंदी लागू केली आहे. पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत.

या कारणांसाठी रस्ते बंद

शनिवारी पुणे रोडवरील द्वारका ते काठे गल्ली आणि आसपासच्या अनेक रस्त्यांवर वाहतूक नियमन करण्यात आले असून, नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कोणते रस्ते बंद?

वाहतुकीसाठी बंद रस्ते:

  • राघोजी भांगरे चौक ते साहिल लॉन्स
  • नागजी चौक ते काठे गल्ली सिग्नल
  • उस्मानिया चौक ते मुरादबाबा दर्गा
  • पुणे हायवेने नाशिक रोडकडून द्वारकाकडे येणारा-जाणारा मार्ग
  • पंचवटी महामार्गावरील संतोष टी पॉइंटकडून द्वारकाकडे येणारी वाहने
  • मुंबई नाक्याकडून द्वारका सर्कलकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद

पर्यायी मार्ग:

  • बिटको पॉइंट
  • नांदूर नाका
  • फेम सिग्नल
  • जनार्दन स्वामी मठ
  • संभाजीनगर रोड
  • इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकमार्गे सिटी सेंटर मॉल
  • गडकरी चौक

Kathe Galli : आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलिस बंदोबस्त

हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर प्रशासन सतर्क झाले असून, महापालिकेच्या कारवाईदरम्यान मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या धार्मिक स्थळाच्या दिशेने जाणारे सर्व मार्ग बंद ठेवण्यात आले आहेत.

नागरिकांना प्रशासनाचे आवाहन

नाशिक महापालिका आणि पोलिस प्रशासनाने नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. तसेच वाहतुकीसाठी पर्यायी मार्गांचा उपयोग करण्याची विनंती करण्यात आली आहे.