Home Minister Amit Shah on a Pune visit : पुणे, 22 फेब्रुवारी: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ((Amit Shah)) दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर असून आज सायंकाळी ते पुण्यात दाखल झाले. त्यांच्या स्वागतासाठी केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री मुरलीधर मोहोळ आणि मंत्री चंद्रकांत पाटील विमानतळावर हजर होते. दौऱ्यात विविध महत्त्वाच्या कार्यक्रमांना हजेरी लावणार असल्याने पुणे वाहतूक पोलिसांनी शहरातील वाहतुकीत बदल केले आहेत.
अमित शहा (Amit Shah) यांचा पुणे दौरा:
✔ कोरेगाव पार्क येथील हॉटेल वेस्टिन येथे आज रात्री मुक्काम
✔ पश्चिम गृह विभागाची बैठक – उद्या सकाळी 11 वाजता
✔ जनता सहकारी बँकेच्या हीरक महोत्सवी समारोप समारंभाला उपस्थिती – हडपसर, विठ्ठल तुपे सभागृह, दुपारी 3 वाजता
✔ प्रधानमंत्री आवास योजना दुसरा टप्पा – बालेवाडी येथे 20 लाख लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीपत्र वाटप
पुण्यातील वाहतुकीत महत्त्वाचे बदल:
विद्यापीठ चौकाकडून बाणेर रोडने राधा चौकाकडे जाणाऱ्या वाहनांनी गणराज चौकामधून डावीकडे वळावे.
मुंबई-बंगळुरू बायपासवरून बाणेर रोडला जाणाऱ्या वाहनांनी बालेवाडी जकात नाका मार्गे प्रवास करावा.
हिंजवडी, वाकड, लोणावळा, मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांनी पाषाण रोड किंवा औंध रोडचा पर्याय निवडावा.
जड वाहनांसाठी शहरात बंदी:
शनिवार मध्यरात्री 12 ते रविवार मध्यरात्री 12 वाजेपर्यंत
विद्यापीठ चौक ते चांदणी चौक – पाषाण रोड, बाणेर रोड, औंध रोडवर जड व अवजड वाहनांना प्रवेश बंद
मिक्सर, डंपर, हायवा, जेसीबी, रोड रोलर यांना शहरात 24 तास प्रवेश बंद
वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा व वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे.