सोमवार, २४ फेब्रुवारी २०२५. माघ कृष्ण एकादशी. शके १९४६, संवत २०८१. वसंत ऋतू. राशिभविष्य – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521)
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
राहू काळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
चंद्र नक्षत्र – पू. षा./ (संध्याकाळी ६.५९ नंतर) उ. षा. आज जन्मलेल्या बाळाची राशी – धनु.
“आज सकाळी १०.०० पर्यंत चांगला दिवस आहे.” विजया एकादशी
मेष:- चंद्राचा बुध आणि शनिशी लाभ योग, हर्षलशी त्रिकोण योग आणि मंगळाशी प्रतियुती आहे. अनुकूल ग्रहमान आहे. दूरचे प्रवास घडतील. परदेश गमनाचे योग आहेत. रवी, बुध, शनी अनुकूल आहेत. प्रगतीची घोडदौड चालू राहील. नात्यात गैरसमज टाळा.
वृषभ:- सुरुवात संथ आहे. नंतर कामाचा वेग वाढेल. वरिष्ठ खुश होतील. नोकरीत मनासारखी कामे होतील. संगणक क्षेत्रात यश मिळेल.
मिथुन:- दिवसाचा पूर्वार्ध अनुकूल आहे. प्रिय व्यक्तीची भेट होईल. अध्यात्मिक लाभ होतील. सखोल संशोधन करण्यास उत्तम कालावधी आहे. भ्रमंती घडेल. क्रोधावर नियंत्रण ठेवा.
कर्क:- संमिश्र दिवस आहे. महत्वाची कामे आज पूर्ण करा. अचानक लाभ होतील. कामाच्या ठिकाणी उत्साह वाढवणाऱ्या घटना घडतील.
सिंह:- अनुकूल ग्रहमान आहे. उत्तम सहकार्य मिळेल. शत्रू पराभूत होतील. कोर्टात यश मिळेल. काही नवीन संधी चालून येतील.
कन्या:- संमिश्र ग्रहमान आहे. विचारपूर्वक पावले उचला. दीर्घकालीन परिणाम करणारे निर्णय होतील. आरोग्याचे प्रश्न निर्माण होऊ शकतात. कनिष्ठ सहकाऱ्याकडून त्रास होऊ शकतो.
तुळ:- दिवसाच्या पूर्वार्धात आर्थिक लाभ होतील. पराक्रम गाजवण्याचा दिवस आहे. गुप्त शत्रू पराभूत होतील. अचानक लाभ होतील. शेअर्स मध्ये फायदा होऊ शकतो.
वृश्चिक:- उत्तराध अधिक अनुकूल आहे. विक्रेत्यांना लाभ होतील. अर्थकारण मजबूत होईल. पाळीव पशूंचे प्रश्न सोडवावे लागतील.
धनु:- लेखकांना उत्तम यश मिळेल. आज महंतांचे करार होऊ शकतात. नात्यातून लाभ होतील. योग्य गुरू मिळेल. सत्संग लाभेल.
मकर:- दिवसाचा पूर्वार्ध खर्चात टाकणारा आहे. वेळोवेळी आर्थिक नियोजन करणे गरजेचे आहे. बौद्धिक क्षेत्र गाजवाल. वक्तृत्व चमकून उठेल. संध्याकाळ आनंदाची.
कुंभ:- सुरुवातीला उत्तम दिवस आहे. सकाळी महत्वाची कामे पूर्ण करून घ्या. आध्यत्मिक लाभ होतील. मुलांकडून मदत घ्यावी लागेल.
मीन:- उत्तम दिवस आहे. मनासारखी कामे पार पडतील. सहकार्य मिळेल. अवघड वाटणारी कामे सोपी होतील. मात्र रवी, बुध, शनीची नाराजी आहे हे लक्षात ठेवा.
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक 8087520521.