शहरात सराईत गुन्हेगारांचे होर्डिंग्स झळकल्याने पोलिसांची कारवाई
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
Nashik illegal hoardings : शहरात विनापरवानगी होर्डिंग लावून नागरिक व व्यावसायिकांमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या गुन्हेगारांविरोधात नाशिक पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे. याप्रकरणी सराईत गुन्हेगारांसह संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
भूषण लोंढेविरोधात गुन्हा दाखल (Nashik illegal hoardings)
अंबड पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात पाथर्डी फाटा, महामार्ग, दिव्या ॲडलॅब सिनेमा, शुभम पार्क रोड आदी ठिकाणी भूषण प्रकाश लोंढे याच्या वाढदिवसाचे अनधिकृत होर्डिंग्स आढळून आले. भूषण लोंढे हा पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याने त्याच्याविरोधात सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण व दहशतीचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांची धडक कारवाई
सराईत गुन्हेगारांविरोधात कठोर पावले
चारच दिवसांपूर्वी सिटी सेंटर मॉल ते त्रिमूर्ती चौक, पवननगर, उत्तमनगर, स्टेट बँक चौक, पाथर्डी फाटा या भागांत सराईत गुन्हेगारांचे होर्डिंग्स झळकल्याचे निदर्शनास आले होते. यानंतर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार संशयित गुन्हेगार गण्या कावळे ऊर्फ गणेश वाघ आणि राकेश कोष्टी यांनी लावलेले बॅनर पोलिसांनी हटवून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांतील गुन्हेगारांचे फोटो देखील निषिद्ध
पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, धार्मिक वा इतर कार्यक्रमांच्या होर्डिंग्सवर गुन्हेगारांचे फोटो आढळल्यास शहराच्या विद्रुपीकरणाच्या आरोपाखाली गुन्हे दाखल केले जातील. स्थानिक पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी त्यांच्या कार्यक्षेत्रात गस्त घालून विनापरवानगी लावलेले होर्डिंग्स हटवण्याची कारवाई करीत आहेत.
पोलिसांचा इशारा: नियम मोडल्यास कारवाई होणार
शहरातील सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या अनधिकृत होर्डिंग्स लावल्यास कठोर कारवाई होणार (Nashik illegal hoardings)असल्याचा इशारा नाशिक पोलिसांनी दिला आहे. नागरिकांनी अशा बॅनर्सबाबत तक्रार करण्यासाठी स्थानिक पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
महत्त्वाचे मुद्दे:
- नाशिक शहरात अनधिकृत होर्डिंग्स प्रकरणी पोलिसांची कठोर भूमिका
- सराईत गुन्हेगार व त्यांच्यासंबंधित व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल
- धार्मिक कार्यक्रमांतील गुन्हेगारांच्या फोटोंवरही कारवाई
- पोलिसांची गस्त व त्वरित कारवाई सुरु