नाशिकरोड येथे अभिवादन सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद
नाशिकरोड (प्रतिनिधी): Nashik Ambedkar Jayanti: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नाशिकरोड येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. नाशिक रोड रेल्वे स्टेशनजवळील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
समाज बांधवांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती
यावेळी संयोजक सुनील कांबळे, जयंती अध्यक्ष मुकेश वीर, अतुल भावसार, शैलेश भावसार, बाळासाहेब गांगुर्डे, आप्पा भालेराव, अक्षय बर्वे यांच्यासह उत्सव समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी बाबासाहेबांच्या विचारांचा जागर करत सामाजिक ऐक्याचा संदेश दिला.
‘राजगृह’ प्रतिकृती ठरली प्रमुख आकर्षण
मुंबईतील ऐतिहासिक राजगृहाचे दर्शन नाशिककरांना
या वर्षी जयंतीनिमित्त नाशिकरोडकरांसाठी एक विशेष आकर्षण ठरले – मुंबईतील ऐतिहासिक ‘राजगृह’ बंगल्याची भव्य प्रतिकृती. छत्रपती शिवाजी महाराज चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने हा देखावा साकारण्यात आला आहे.
भव्यतेचे दर्शन : ४०x२० फूट आकार, २७ फूट उंची
ही प्रतिकृती आनंद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली उभारण्यात आली असून तिचे माप ४० बाय २० फूट आहे आणि उंची तब्बल २७ फूट आहे. तीन मजली या प्रतिकृतीच्या पहिल्या मजल्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती आणि तथागत गौतम बुद्धांची भव्य २७ फूट उंचीची मूर्ती साकारण्यात आली आहे.
सामाजिक ऐक्याचा संदेश देणारी भव्य जयंती
या भव्य कार्यक्रमाने नाशिकरोड परिसरात सामाजिक ऐक्य, बंधुता आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा जागर केला. नागरिकांनी मोठ्या संख्येने या देखाव्याला भेट देत आयोजकांचे कौतुक केले.